dj in weddings esakal
नाशिक

प्रार्थनास्थळे चिडीचूप, विवाह सोहळ्यात मात्र भोंग्यांचा दणदणाट

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : मनसेच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचे आवाज कमी झाले असले तरी विवाह सोहळ्यामधील भोंगे मात्र जोरात आहेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. या सोहळ्यांमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकाचा वापर सर्रास होत आहे. समारंभात पाहुणे व वऱ्हाडींना धडकी भरावी, असा आवाजाचा दणदणाट असून, प्रबोधन करण्याची गरज आहे.

विवाह म्हटला, की आनंदाला उधाण येते. नवे कपडे, रोषणाई, जेवणावळी, पाहुण्यांचा लवाजमा त्यात बॅडबाजा आणि सनई संगीताची जोड आलीच. आता मात्र उच्च आवाजावर बंदी असली तरी ग्रामीण भागात लग्न समारंभात मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावले जात आहेत. संगीताच्या तालावर ठेका धरणाऱ्यांनी मोठा आवाज करून सर्वांना धडकी भरवली आहे. संगीताच्या मोठ्या आवाजावर कोण नियंत्रण आणणार, असा प्रश्‍न उपस्थित करून अनेक जण गप्पच राहणे पसंत करतात. मोठ्या आवाजावर बंदी असली तरी कारवाईने हा प्रश्‍न सुटणार नसून त्यासाठी प्रबोधन गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात.

अनेक ठिकाणी आवाजाचे उल्लंघन केले जात आहे. कोरोनानंतर ग्रामीण भागात धुमधडाक्यात विवाह होत आहेत. ग्रामीण भागात वधू- वराच्या घराजवळच विवाह होतात. हळदीच्या कार्यक्रमांपासून लग्नापर्यत हमखास लाऊडस्पिकर लावले जातात. मोठ्या आवाजात गाणी वाजतात. अनेक ठिकाणी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले जात असल्याने नागरिक त्रस्त होतात. रहिवासी क्षेत्रात साधारण ४५ ते ५५ डेसिबल एवढा आवाज असावा, असे कायदा सांगतो. पण विवाहात वेळी तो वाढतो. वृद्ध, आजारी व्यक्तींना ते त्रासदायक आहे. याबाबत कोणी सांगायला गेले, तर वाद होतात. लाउडस्पिकरचे दरही जास्त आहेत. वधू-वरपित्यांचा त्यावर मोठा खर्च होतो. याबाबत प्रबोधन झाले पाहिजे.

सामाजिक भान गरजेचे

लग्न सोहळ्याव्यतिरिक्त सार्वाजनिक कार्यक्रमात गावागावांतून वेगवेगळ्या मिरवणुका काढल्या जातात. मिरवणुकीत आवाजाची पातळी नियमाचा भंग करतानाही दिसते. मिरवणुकीत लावलेले लाऊडस्पिकर उच्च आवाजाचे असतात. त्यामुळे सर्वांनी सामाजिक भान ठेवून कानठळ्या बसवणारा आवाज कमी केला पाहिजे. पिंपळगांव बसवंत शहरातील बहुतांश मंगल कार्यालये, लॉन्सभोवती नागरी वसाहती आहेत. भोंगे, डीजे, बॅन्ड पथकांच्या दणदणाटाने नागरिक त्रस्त आहेत.

"प्रार्थनास्थळावरील भोंग्याच्या आवाजाची पातळी खाली आली. पण विवाहादरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास समजून घ्यावा."

-प्रकाश गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT