Inauguration of more than 200 new projects in city  esakal
नाशिक

Akshaya Tritiya 2023 : डिसेंबर अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात सदनिका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अक्षयतृतीया मुहूर्त साधत शहरात दोनशेहून अधिक नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले.(Inauguration of more than 200 new projects in city on Akshaya Tritiya Muhurat nashik news)

विशेष करून बजेट फ्लॅटचे मागणी लक्षात घेता अशा प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात उद्‌घाटन झाले. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिकमध्ये घरांची मागणी लक्षात घेऊन अक्षयतृतीया मुहूर्तावर नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. हजाराहून अधिक सदनिकांची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. अक्षयतृतीया मुहूर्तावर जवळपास १०० कोटींची उलाढाल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राज्य शासनाने नाशिकसाठी रेडीरेकनरच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. मुद्रांक शुल्कदेखील जैसे थे असल्याने त्याचाही परिणाम खरेदी विक्रीच्या नोंदणीवर होणार आहे. वडाळा शिवार, नाशिक रोड, जेल रोड, पाथर्डी, अंबड, मखमलाबाद या शहराच्या बाह्य भागांमध्ये नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन मोठ्या प्रमाणात झाले.

"राज्य शासनाने रेडीरेकनरचे जैसे- थे ठेवलेले दर, बाजारात घरांना असलेली मागणी लक्षात घेता अक्षयतृतीया मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. नाशिकच्या विकासाला याचा नक्कीच फायदा होईल." - कृणाल पाटील, अध्यक्ष, नाशिक, क्रेडाई मेट्रो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT