अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे sakal
नाशिक

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

दादा भुसे;जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांचे जनजीवनही विस्कळित झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता.३०) येथे दिला.

सरकारी विश्रामगृहात जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकर मदत करण्यासाठी तत्काळ पंचानामे करण्यात यावेत. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

सरकारी जमिनींवरील निवासाच्या उद्देशाने केलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याबाबतची सूचना श्री. भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केली. आरोग्य, रुरबन, जलजीवन मिशन योजनांचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT