income tax raid.jpg
income tax raid.jpg 
नाशिक

कोट्यावधींचा करचुकवेपणा आला अंगाशी... मग काय सुरू छापासत्र..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळखोरीत निघालेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना पोल्ट्री खाद्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने जमिनीच्या आर्थिक व्यवहारात कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी (ता. 21) नाशिकसह मुंबईत सहा ठिकाणी छापे टाकले. 

जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचे प्रकरण 

नाशिकमध्ये एन.डी. पटेल रोडसह चार ठिकाणी आणि मुंबईत दोन कंपन्यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू असल्याचे समजते. वडाळीभोई येथील एका व्यापाऱ्याकडून नाशिकच्या एन.डी. पटेल रोडवरील कंपनी पोल्ट्रीसाठी मका खरेदी करीत असे. मात्र, कंपनीने या व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकविली. कालांतराने कंपनीच दिवाळखोरीत निघाली. या प्रकरणी न्याय प्राधिकरणाकडे खटला सुरू आहे. दरम्यान, व्यापाऱ्याने कंपनीच्या मालमत्तेची माहिती अधिकार कायद्यान्वये घेतली असता, त्यामध्ये या कंपनीने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या आणि त्या अन्य दोन कंपन्यांमार्फत विक्री केल्या. यामध्ये या कंपन्यांचे संचालक व दोन कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा कर चुकवून शासनाची फसगत केल्याचे निदर्शनास आले.

रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरू होते

या प्रकरणात व्यापाऱ्याने प्राप्तिकर विभागाकडे गेल्या 2019 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत, शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एन.डी. पटेल रोडवरील कंपनीचे कार्यालय, आनंदवली आणि कर्मयोगीनगर येथील संबंधित कंपन्यांच्या तीन संचालकांचे बंगले, तसेच मुंबईतील दोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरू होते. नाशिकस्थित या कंपनीने नाशिकमधील एका सहकारी बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकेलाही गंडा घातल्याचे समजते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT