नाशिक

दिव्यांगांच्या पेन्शनसाठी आमदार खोसकर आक्रमक २,५०० वरून ६ हजारांची मागणी

CD
पान चार दिव्यांगाना सहा हजार रूपये मासिक पेन्शन सुरू करा आमदार हिरामण खोसकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. १८ : हात नाही, पाय नाही, डोळ्यांना जग दिसत नाही… काहींना स्वतःच्या हाताने अन्नही खाता येत नाही. अपघात, पोलिओ अथवा जन्मजात व्याधींमुळे आयुष्यभर दुसऱ्यांच्या आधारावर जगावे लागणाऱ्या दिव्यांग बांधवांना आता तरी सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारी २,५०० रुपयांची मासिक पेन्शन सहा हजार रुपये करण्यात यावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आजच्या महागाईच्या काळात औषधोपचार, दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी आणि घरखर्च भागवताना दिव्यांग कुटुंबांची अक्षरशः दमछाक होत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील परिस्थिती तर आणखी गंभीर आहे. अशा परिस्थितीत २ हजार ५०० रुपयांची मदत ही आधार नसून केवळ तुटपुंजा दिलासा ठरत आहे, अशी खंत खोसकर यांनी व्यक्त केली. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही केंद्र सरकारकडे दिव्यांगांच्या या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. सरकार हिवाळी अधिवेशनात काय निर्णय घेते, याकडे राज्यातील दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : उसाच्या पहिल्या उचलीसाठी सोलापुरात 'स्वाभिमानी' आक्रमक; माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप पाडले बंद

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT