Electricity Bill esakal
नाशिक

अबब! स्ट्रीट लाईटचे वीजबिल पाहून ग्रामपंचायतींचे डोळे पांढरे

महेंद्र महाजन

नाशिक : ग्रामविकास म्हणजे बांधकाम असे काहीसे समीकरण बनलेल्या राज्यात अलीकडच्या काळात विकासाच्या व्याख्येत हायमास्टचा समावेश झाला होता. त्याचा परिणाम असा झाला, की ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांच्या वीजबिलात डोळे पांढरे होईपर्यंत वाढ झाली. अबब! वीजबिल वाढले...असं म्हणण्याची वेळ ग्रामविकासवर आली. त्यामुळे अखेर ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यावर हायमास्ट उभारले जाऊ नये, असा निर्णय घेतलाय.

ग्रामविकास विभागाच्या डोकेदुःखीमध्ये भर

हायमास्ट उभारण्यावरून गेल्या काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात गदारोळ झाला होता. अगदी हायमास्टची उंची किती, त्याचे वजन किती इथंपासून ते हायमास्ट सुरु किती इथंपर्यंतच्या प्रश्‍नांचे धुमारे सत्ताधाऱ्यांच्याविरोधात उठले होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतरण होत गेले आणि मागील प्रश्‍नांकडे कानाडोळा करत हायमास्ट उभारण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. हे लोण एव्हाना राज्यभर पसरले. मग सरकारकडून दिव्यांच्या वीजबिलाचे पैसे न आल्याने वीज कनेक्शन तोडले गेले. त्याच्याविरोधात रान उठले आणि पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात नाराजीचे धुमारे सुरु झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनातर्फे अनुदान आले नाही, तर द्यायचे कसे? असे म्हणत पैशांचा चेंडू राज्य सरकारच्या कोंड्यात भिरकावून देण्यास सुरवात झाल्याने ग्रामविकास विभागाच्या डोकेदुःखीमध्ये भर पडली होती.

वीजबिल नियंत्रणासाठी धोरण

हायमास्ट का बसवू नयेत यासाठी राज्य सरकारने वीजबिल नियंत्रणाच्या धोरणावर बोट ठेवले आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांच्या वीज देयकावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजेच्या वापरात बचत व काटकसर करणे आवश्‍यक बनले आहे, असे नमूद करत ग्रामविकास विभागाने ही बाब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी, असे परिपत्रक स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना विविध योजनांमधून अनुदान मंजूर करत असताना हायमास्ट दिवे बसविण्यास मान्यता देऊ नये. त्यासाठी कोणत्याही योजनेतील मंजूर अनुदानातून खर्च करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

अपारंपारिक ऊर्जेचा आग्रह

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांच्या वीज वापरात बचत करण्यासाठी दिवे एलईडी चे वापरण्यात यावेत. शिवाय पथदिवे सौर ऊर्जेवर आधारित करण्यात यावेत हा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे. त्याकडे ग्रामविकास विभागाने यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT