Wheat Flour esakal
नाशिक

Nashik News : मालेगावमध्ये विजेचे दर वाढल्याने दळण झाले महाग! गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाच्या वापरात असलेल्या सर्व गोष्टी दिवसेंदिवस महाग होवू लागल्या आहे

जलील शेख

मालेगाव : दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाच्या वापरात असलेल्या सर्व गोष्टी दिवसेंदिवस महाग होवू लागल्या आहे. डाळी, गॅस सिलिंडर, इंधन, औषधे यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घसघशीत वाढ झाली आहे.

यासह विजेच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. वीजेचे दर वाढल्याने पिठाची गिरणी, मसाला कांडप यांच्या दरातही वाढ झाली आहे.

मालेगाव शहरात दशकापूर्वी अवघ्या दोन रुपये किलोने धान्य दळून मिळायचे. महागाईमुळे तेच धान्य दळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सहा ते सात रुपये किलोने मिळत आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट देखील कोलमडले आहे. (increase in electricity rates in Malegaon ata chakki became expensive Housewives financial budget collapsed Nashik News)

येथील कॅम्प भागात सहा रुपये किलोने तर शहरातील काही ठिकाणी सात रुपये किलो दळणाचा भाव आहे. शहरात शेकडो पिठाच्या गिरण्या आहे. दळणाचे भाव वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, मका, नागली व गरम मसाला यासह अनेक प्रकार दळले जातात. ग्रामीण भागात काळा मसाला कांडप तीस रुपये किलो तर तेच भाव शहरात चाळीस ते पन्नास रुपये किलोने आहे. यंदा उन्हाळ्यात मसाल्याच्या हंगामात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरात खासगी वीज कंपनीकडून वीजेचा पुरवठा केला जातो. यात या वीजेचे दर अधिक असल्याने नागरिकांना त्याचा तोटा देखील सहन करावा लागत आहे.

घरगुती चक्कीला वाढती मागणी

शहरात खासगी कंपनीकडून वीज वितरण सुरु झाल्यापासून वाढीव वीज बील येत आहे. एक ते शंभर युनिटपर्यत वेगळे तर शंभरावर युनिटसाठी वेगळे दर आहेत.

दळणाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने घरगुती छोटी चक्कीला मागणी वाढली आहे. छोट्या कुटुंबातील अनेक नागरिकांनी घरात छोट्या पिठाच्या गिरण्या घेतल्या आहे.

दळणाचे दर असे-

१) गहू, ज्वारी, बाजरी - ६ ते ७ रुपये किलो.

२) चणाडाळ, रवा, कुळीद, भाजणी - ७ ते ८ रुपये किलो.

३) पापडची डाळ व पापडचे तांदूळ - ८ ते ९ रुपये किलो.

४) मका व नागली - १० रुपये किलो .

हे शहरातील दर असून ग्रामीण भागात २८ ते ३० रुपये पायलीनुसार दर आकरले जात आहे.

"चक्की व्यवसायाला शासनाने अनुदान द्यावे, तसेच त्यांना घरगुती वीजनुसार दर अकरावे. सध्या चक्की व्यवसायाला ग्राहक व वीजकंपनी कडून आर्थिक भुर्दंड बसत आहे. परिणामी दळणाचे दर वाढवावे लागतात. शासनाने लघुउद्योगांना दिलासा देण्यासाठी सवलती द्याव्यात."

- जमील हाजी, अध्यक्ष, मालेगाव पीठ गिरणी असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT