A vineyard that survives all odds. esakal
नाशिक

Nashik Agriculture: बळीराजाला कांद्यापाठोपाठ द्राक्षही रडविणार! निर्यातीच्या खर्चात वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांची वाढली चिंता

केंद्र सरकारने अघोषित कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. आता द्राक्ष निर्यातीच्या खर्चात वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : केंद्र सरकारने अघोषित कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. आता द्राक्ष निर्यातीच्या खर्चात वाढ झाली आहे. यामुळे द्राक्षाची गोडी निर्माण होण्यापूर्वीच द्राक्षाचे भाव कमी होणार आहेत. (Increase in export costs raised concern among grape grower farmers Nashik Agriculture)

बांग्लादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने निफाड, दिंडोरी व सांगलीमधून द्राक्षाची निर्यात घटली आहे. केंद्रात विदर्भातील नेत्यांचे वजन असल्याने विदर्भातील संत्र्याला अनुदान मिळत आहे.

मात्र, नाशिकच्या द्राक्षाला अनुदान मिळत नसल्याने द्राक्षाचे दर घसरण्याची भीती आहे. सुएझ कालव्यामार्गे युरोपला द्राक्ष पाठविण्यासाठी प्रतिकंटनेर १८०० ते दोन हजार डॉलर दर होता. मात्र, हा मार्ग बंद आहे.

काही शिपिंग कंपनीने द्राक्ष प्रतिकंटेनरला पाच ते सहा हजार डॉलर दर केला आहे. द्राक्ष निर्यातीसाठी खर्च वाढल्याने द्राक्ष व्यापाऱ्यांनी बागायतदारांकडून २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने द्राक्ष खरेदी केली.

त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा ५८ हजार ४१८ हेक्टरवर द्राक्षाची लागवड झाली असून, सर्वाधिक २३ हजार १७१ हेक्टर लागवड निफाड तालुक्यात झाली आहे.

यंदा द्राक्षाला अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादक चिंतेत आहेत. द्राक्ष निर्यातीला नाशिक जिल्ह्यातून सुरवात झाली असून, १,५३९ कंटेनरमधून २० हजार ५८२ टन द्राक्ष रवाना झाले आहेत. नेदरलँडला २० हजार ४४२ टन द्राक्ष निर्यात झाली असून, स्वीझरलॅण्ड, स्वीडन, रोमोनिया या ठिकाणीही नाशिकची गोड रसाळ द्राक्ष पोहोचली आहेत.

गेल्या वर्षापासून रशिया-युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यात संकटात सापडली आहे. त्या संघर्षाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या द्राक्षावर भरमसाट आयात शुल्क असल्याने निर्यातीचा टक्का घसरला आहे.

स्थानिक बाजारपेठांमध्ये द्राक्षाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे निच्चांकी दराने द्राक्ष हंगामाला सुरवात झाली आहे. यापूर्वी हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाचे दर तेजीत असतात. यंदा दर घसरल्याने उलट स्थिती आहे. थाॅमसन, सोनाका वाणाच्या द्राक्षांना १८ ते २० रुपये दर मिळत आहे. काळ्या रंगाच्या वाणाला २५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

"बांग्लादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने नाशिकसह सांगलीतून होणारी निर्यात घटली आहे. दर कमी झाल्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. बांग्लादेशात सध्या द्राक्षांवर १०६.७६ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क आकारले जात आहे. बांग्लादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्काच्या ५० टक्के सवलत दिली आहे. संत्र्यांवरील अनुदानाप्रमाणेच द्राक्षावरील आयात शुल्काच्या ५० टक्के अनुदान मंजूर करावे. जेणेकरून बांग्लादेशात द्राक्ष निर्यात पुन्हा सुरू होण्यास मदत होऊन उत्पादकांना फायदा होईल."

- कैलास भोसले, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

"अनेक संकटावर मात करून पोटाच्या गोळ्याप्रमाणे द्राक्षबागा जगवल्या. अवकाळी पाऊस, असमतोल हवामानाशी झुंज देत द्राक्षबागा फुलविल्या. सोसायट्यांचे कर्ज काढून लाखो रुपये भांडवल द्राक्षबागेत गुंतविले. अपेक्षित दर मिळत नसल्याने खर्चही निघेल की नाही, या विवचंनेत शेतकरी आहेत. ‘एकाला तुपाशी, दुसरा उपाशी’ अशी दुहेरी भावना मायबाप सरकारने ठेवू नये."-नारायण दरेकर द्राक्ष उत्पादक,विंचूर

देशाचा द्राक्षनिर्यातीचा आलेख

२०१७-१८ : १८८२२१ टन- १९०० करोड

२०१८-१९ : २४६१३३ टन- २३३५ करोड

२०१९-२० : १९३६९० टन- २१७७ करोड

२०२०-२१ : २४६१०७ टन- २२९८ करोड

२०२१-२२ : २६३०७५ मॅट्रिक टन- २३०२ करोड

२०२२-२३ : २६७९५० मॅट्रिक टन- २५४३ करोड

तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर)

निफाड २३१७१

दिंडोरी १८६८३.२५

चांदवड ६५६३.५८

नाशिक ६४५६.९८

सिन्नर ९९८.९५

मालेगाव ७१४

येवला ६८८

बागलाण ६५०

त्र्यंबकेश्वर २१६

देवळा ९०

कळवण ८८.५०

इगतपुरी ८१.०८

नांदगाव १६

सुरगाणा १

एकूण ५८४१८.२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT