Raisins esakal
नाशिक

बेदाणा तयार करणे झाले महाग; उत्पादन साहित्याच्या दरात मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्षाबरोबरच बेदाणा (Raisins) निर्मितीचा हंगामाने निफाड तालुक्यात वेग घेतला आहे. हिरवा पाचू अर्थात बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. डिंपींग आॅईल, सल्फर(sulphur), बॉक्स अशा साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादकांच्या अडचणीत वाढ होऊन बेदाणा तयार करणे महाग झाले आहे.

निफाड तालुक्यात पन्नास हजार एकरावर द्राक्षबागाचे क्षेत्र विस्तारले आहे. द्राक्षांची भिस्त उपउत्पादन असलेल्या बेदाण्यावर मोठ्या प्रमाणात असते. उगांव, कसबे सुकेणे, पिंपळगाव बसवंत परिसरात मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीचे शेड उभारण्यात आले आहेत. निफाड तालुक्यात यंदाही दहा हजार टन बेदाणा निर्मिती होण्याची शक्यता आहे. सध्या द्राक्षाला सरासरी ३० रूपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीकडे वळले आहेत.

गेल्या पाच वर्षात बेदाण्याने जगातील बाजारपेठ कवेत घेतली आहे. अफगाणच्या (Afganistan) बेदाण्याला नाशिकचा बेदाणा टक्कर देऊ लागला आहे. मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, श्रीलंका या देशात दरवर्षी किमान पाच हजार टन नाशिकचा पिवळा बेदाणा पोहचत आहे. सध्या सव्वाशे रूपये प्रतीकिलो असा दर पिंपळगाव बाजार समितीत मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार बेदाणा तयार करत आहे. सुकामेवा, टुथपेस्ट, आयुर्वेदीक औषधे आदींसाठी बेदाण्याचा वापर होतो. बेदाण्याच्या निर्मितीसाठी डिंपींग आॅईल, सल्फर ची गरज असते. यास बॉक्स, प्लास्टीक याचे दरही वाढल्याने बेदाण्या निर्मितीला महागाईच्या झळा बसत आहे.

जुने दर-सध्याचे दर

डिंपीग आॅईल: 3200-4800 रूपये

सल्फर: 1900-3100 रूपये

प्लास्टीक: 115-175 रूपये किलो

"बेदाण्याचा उत्पादनखर्च वाढला आहे. मजुरीचे दरही वाढले आहेत. बेदाणा उत्पादन करणे मुश्‍कील झाले आहे. शासनाने दर कमी करून साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे."

- रमेश जाधव (बेदाणा उत्पादक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT