ZP Gram Sevak Salary esakal
नाशिक

ZP Gram Sevak Salary: जिल्ह्यातील 63 कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

सकाळ वृत्तसेवा

ZP Gram Sevak Salary : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार १६ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.

या निर्णयाचा लाभ नाशिक जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांना होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Increase in salary of 63 contractual Gram Sevak in district nashik news)

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक काम बघत असतो. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक दर्जाचे देखील ग्रामसेवक कार्यरत आहे. त्यांना नियमित करण्यापूर्वी रुपये ६ हजार इतके मानधन देण्यात येत होते.

हे अतिशय कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी अनेकदिवसांची होती. यासाठी अनेकदा आंदोलने देखील झालीत. त्यावर, राज्य शासनाकडून मानधनात वाढ करण्याबाबत विचार सुरू होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारी (ता.१३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्राम विकास विभागांतर्गत येणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनवाढीबाबत चर्चा होऊन, यात कंत्राटी ग्रामसेवक यांना मिळणारे ६ हजार आणि प्रवासी भत्ता १५०० रुपये असे ७ हजार ५०० वेतनावरुन १६ हजार इतके वेतन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधन वाढले आहे. याचा फायदा जिल्ह्यात कंत्राटी काम करत असलेल्या ६३ ग्रामसेवकांना होणार आहे. तालुकानिहाय कंत्राटी ग्रामसेवक नाशिक (१), इगतपुरी (२), त्र्यंबकेश्वर (१), पेठ (२), सुरगाणा (२), दिंडोरी (३), देवळा (२), बागलाण (४), मालेगाव (१२), नांदगाव (१), येवला (७), निफाड (६), सिन्नर (१२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

Solapur BJP Celebration: मंगळवेढ्यात भाजपकडून ‘झालमुडी-जिलेबी’ वाटप, बाईक रॅली व फटाक्यांची आतषबाजी

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

SCROLL FOR NEXT