devidas pingale
devidas pingale 
नाशिक

नोव्हेंबरमध्ये बाजार समितीच्या उत्पन्नात एक कोटी बारा लाखांनी वाढ - देविदास पिंगळे

सकाळवृत्तसेवा

म्हसरूळ (नाशिक)  : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून, त्यांचा परिमाण मोठमोठ्या उद्योग धंद्यांवर झाला होता.ऑगस्ट महिन्या च्या तुलनेत  एक कोटी बारा लाख रुपयांनी वाढ झाल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिगळे यांनी दिली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, ढकांबे, पिंपळणारे, अक्राळे, तळेगाव, पिंपळनारे, वरवंडी, आंबे, शिवणाई, चांदशी,दरी , मातोरी, मुंगसरा, नांदूर - मानुर, ओढा, लाखलगाव, माडसांगवी, शिंदे-पळसे, महिरवणी, तसेच शहरालगत असलेल्या म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, अंबड, पाथर्डी, सातपूर, नाशिकरोड, चेहडी, सामनगाव, एकरहरे येथून शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात घेऊन येत असतात. नाशिक जिल्हा भरातून तसेच परजिल्ह्यातून कांदा, बटाटा, लसूण डाळींब, इतर फळे व अन्नधान्यदेखील शरदचंद्रजी मार्केट यार्डात येत असतात.

१ कोटी १२ लाख १२ हजार ३९५ लाखांची वाढ

बाजार समितीची मार्केट फी हे मूळ उत्पन्नस्त्रोत आहे.सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे,त्याचा परिणाम मोठमोठ्या उद्योगधंद्यांसह इतर क्षेत्रांवरही ही दिसून येतो.बाजार समितीत ऑगस्टमध्ये ७३ लाख ११ हजार ५२६ रुपये इतके उत्पन्न झाले होते त्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये या दोन महिन्यांत १ कोटी ८५ लाख २३ हजार ९२१ रूपये  उत्पन्न झाले. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये १ कोटी १२ लाख १२ हजार ३९५  रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.

दोन कोटींचा टप्पा ओलांडणार
बाजार समितीत नियोजनबद्धपणे आखलेल्या योजना आणि केलेल्या आमूलाग्र बदलामुळे उत्पन्नात सतत वाढ होत आहे. उत्पन्नवाढीचा हा आलेख असाच उंचावत ठेवणार असून, लवकरच दिन कोटींचा टप्पा ओलांडणार आहे, असा विश्वास सभापती पिंगळे यांनी व्यक्त केला.

उत्पन्नवाढीचा आलेख उंचावलेलाच

महिना         उत्पन्न               वाढ   

ऑगस्ट        ७३,११,५२६/-            --------------

सप्टेंबर        १,१९,७४,०३७/-          ४६,६२,५११/-

ऑक्टोबर       १,६०,७४,१७३/-          ८७,६२,६४७/-

नोव्हेंबर        १,८५,२३,९२१/-          १,१२,१२,३९५/-

ऑगस्ट महिन्यात पदभार स्विकारला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मुळे बाजार समितीचे उत्पन्न घटले होते.यामुळे अक्षरशः कर्मचाऱ्याचे वेतन देणे सुध्दा अवघड झाले होते.उत्पन्नवाढीसाठी,यापूर्वी केलेल्या कामकाजाचा असलेला अनुभव शेतकरी व आडते -व्यापारी यातील दुव्याची सांगड घालत प्रशासनाच्या वेळोवेळी आढावा घेत उपत्न वाढविले.

देविदास पिंगळे
सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT