Monsoon Trek Tips esakal
नाशिक

Monsoon Trek Tips: पावसाळ्यात दरी खोऱ्यामध्ये भटकंतीचं वाढतंय प्रमाण! तुम्हालाही जायचंय? ही काळजी घ्याल

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकंतीचे प्रमाण वाढले आहे. निसर्गप्रेमी जिल्ह्याच्या विविध गड-किल्ल्यांवर भटकंतीचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. पावसाळ्यात नवीन ठिकाणी आणि आडवळणी भागांमध्ये भटकंती करू नये, अतिआत्मविश्वास जिवावर बेततो.

त्यामुळे माहिती नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन दुर्ग भटकंती करणाऱ्या अनुभवी व्यक्तींनी केले आहे. (Increasing amount of tourism trekking guide in forts Valley What to take care nashik news)

हरिहर गड

भटकंतीच्या अतिउत्साहामुळे व अतिधाडसामुळे दरवर्षी अनेकांचा जीवदेखील जातो. हरिश्चंद्र गडावर भटकंतीसाठी गेलेले सहा जण धुक्यामुळे रस्ता भरकटले. रात्र झाल्याने ते एकमेकाला भेटले नाहीत.

सकाळी शोध घेतला असता त्यातील एकाचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे गड किल्ले असो की, पावसाळी पर्यटन यासाठी जाताना काय काळजी घेतली पाहिजे. याविषयी या अनुभवींची मते जाणून घेतली असता, त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला.

दुर्ग भटकंती करणारे दिलीप गीते म्हणाले, 'सोशल मीडियावरील फोटो, रील्स आणि पोस्ट पाहून दुर्ग भ्रमंती, पावसाळी आणि साहसी पर्यटनाला जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे. वास्तवात आपल्याला ज्या भागाची पूर्ण माहिती नाही, अशा ठिकाणी स्थानिक व्यक्ती (गाइड) सोबत घेणे आवश्यक आहे.

कुठल्याही किल्ल्यावर जाताना सकाळी लवकर जावे, सायंकाळी जाण्याचे धाडस करू नये. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या ठिकाणी पाऊस आणि धुके असते. त्यामुळे तुम्हाला जाताना आवश्यक त्या साधनांसह स्थानिक व्यक्ती सोबत घेणे आवश्यक आहे.

' एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर भविष्यात ते होऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातात. मात्र, गड किल्ल्यांवर का केल्या जात नाहीत ? अपघात, दुर्घटना घडू नयेत यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी दिला जातो मात्र सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना होणे आवश्यक आहे.

त्यासाठी किल्ल्यांवर जाण्याची नोंद घेण्याची व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी चौकी उभारून किल्ल्यावर जाणाऱ्यांच्या नोंदणी घेऊन त्यांचा आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक घ्यावा यासाठी उपयोजना करावी असे आव्हान गिरिदुर्ग भटकंती संस्थेचे दिलीप गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

"पावसाळी दिवसांमध्ये आडवळणी भागांमध्ये ट्रेकिंग अथवा " पाटवस्ती करू नये. कर आस ग्रुप ऑक्टिव्हिटी म्हणून करावी. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असते, त्यामुळे वाट शोधण्यासाठी जीपीएस सिस्टिमचा वापर करावा किंवा स्थानिक व्यक्तीला सोबत ठेवावे. गरम पाणी तसेच कपडे सोबत ठेवावेत. कुटुंबीयांना भटकंतीसाठी जात असलेल्या ठिकाणाची माहिती व सोबत असलेल्या सदस्यांपैकी कोणाचे तरी संपर्क क्रमांक देऊन ठेवावेत."

- दिलीप यादवराव गिते, गिरीदुर्ग भटकंती संस्था

अशी घ्या काळजी

ट्रेक करतांना काय काळजी घ्याल ?

चांगले ग्रिप असलेले शुज वापरावे.

काठी नेहमी सोबत असावी.

शिट्टी बरोबर ठेवावी.

पाण्याची बाटली व बिस्किट गरज नसली तरी सोबत ठेवावे.

ट्रेकला जातांना अनुभवी ग्रुप सोबत जावे अथवा स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा.

बऱ्याच ठिकाणी गूगल मॅप काम करत नाही. त्यामुळे गूगल मॅप वर अवलंबून ट्रेक करू नये .

पावसाळयात पाण्याच्या प्रवाहात अति धाडस करू नये .

धोकादायक किल्ले -

औंढा किल्ला (सिन्नर)

कुलँग , मदन , अलंग (अ. नगर)

हरिहर (त्र्यंबक)

घरगड (वाडीवऱ्हे)

चांदवड किल्ला

सालोटा (बागलाण)

हे किल्ले काही ठिकाणी चढाई साठी अवघड समजले जातात.

मात्र निष्काळजीपणा केला तर पांडवलेणी , रामशेज पण अवघड ठरु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT