MIDC nashik
MIDC nashik  esakal
नाशिक

Nashik News : कारखान्यांच्या खडखडाटात ‘ढिश्‍क्यांव..ढिश्‍‍क्यांव’..!

सतीश निकुंभ

Nashik News : सकाळी घरात लक्ष्मी आली; दुपारी वडील, आजोबा अन् काकांनी जीवनयात्रा संपवली या घटनेने सातपूर हादरले तर पोटच्या मुलीचा आईने गळा चिरल्याने कामगार वस्ती हळहळली. औद्योगिक वसाहतीत महिंद्रा गेटवर सिनेस्टाइल गाडीचा पाठलाग करून गोळीबार झालेला व यातून लोकप्रतिनिधीही न सुटल्याने पेरले तेच उगवल्याचा अनुभव सातपूरकरांनी २०२३ या वर्षात घेतला.

निमा, आयमाच्या निवडणुकांमुळे औद्योगिक प्रश्‍न सोडविण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले. परंतु औद्योगिक वसाहतीचा विस्तार यंदाही झाला नाही, याचीदेखील खंत आहेच. उद्योगांचे भूखंड घेऊन त्याचे तुकडे पाडून त्यावर पोटभाडकरूंच्या भाड्यावर जगणारी जमात वाढत असल्याची खंतदेखील सातपूरकरांमध्ये कायम राहीली.- सतीश निकुंभ (increasing crime in satpur area of nashik city nashik recap 2023 news)

कामगारांची वसाहत असलेल्या सातपूरने नाशिकच्या विकासाला हातभार लावला आहे. कारखान्यांमधील खडखडाट नाशिकचा विकास सामावलेला असतानाच या खडखडाटातून रिव्हाल्वरच्या नोझलमधून ढिश्‍क्यांव..ढिश्‍क्यांवचे बरेचसे आवाज आता ऐकू येवू लागल्याने कारखान्यांवर युनियन संघटनांऐवजी भाई- दादांच्या वर्चस्वाची लढाई दिसून आली.

महिंद्रा सोना व इपिराक कंपनीच्या गेटसमोर सिनेस्टाइलने गोळीबार प्रकरणाने मुंबईच्या गिरण्या शेवटच्या घटका मोजत असतानाचे चित्र निर्माण केले. गोळीबाराबरोबरच या घटनेत वापरण्यात आलेली हत्यारे अवैध असल्याचा मुद्दा सर्वाधिक गंभीर दिसून आल्याने पुरोगामी महाराष्ट्राचे चित्र हेच असा सवाल सातपूरकरांमध्ये विचारला गेला.

पुन्हा एकदा पोलिसांचे अपयश यानिमित्ताने समोर आले. भाईगिरीची क्रेझ व कमी काळात श्रीमंत होण्याच्या नादात औद्योगिक व कामगारनगरीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे हे द्योतक ठरले. एकामागे माग क्राईम घडतं असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या हादेखील चर्चेचा विषय ठरला.

एकाची बदली झाली की दुसऱ्याची कुरघोडी त्यावर पुन्हा बदली झालेल्यांकडून कुरघोडी या पोलिसांच्या सापशिडीच्या खेळात सातपूरच्या कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आली. गोळीबाराच्या या फटाकड्यांच्या खेळात नगरसेवक व त्यांचे कुटुंबीयदेखील सुटले नाही. अर्थात पेरले तेच उगवले असेच म्हणावे लागेल. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले होते. या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. यातून एक धक्कादायक कारण समोर आले. या महिन्याच्या चिमुकलीचा आपल्या जन्मदात्या आईनेच घरातील सुरीने गळा चिरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे एका मातेचा निर्दयीपणा सातपूरकरांनी अनुभवला.

रोजंदारीवर काम करणारा कामगार या शोषित वर्गाचे शोषण करण्याचे अनेक प्रकार त्यात खासगी सावकारीचा मोठा वाटा असतो. वरकरणी सातपूर भागात सावकारी नाही असे पोलिस ओरडून सांगत असले तरी राधाकृष्णनगरमध्ये शिरोडे कुटुंबीयांच्या आत्महत्येच्या प्रकारातून सातपूर पोलिसांचे पितळ उघडे पडले.

औद्योगिक संघटनांना बळ

निमा या औद्योगिक संघटनेला धर्मादाय आयुक्तांच्या निकालाने बळ मिळाले. कार्यकारिणीची नियुक्ती करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर उद्योगांचे प्रश्‍न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला. उद्योगांना एकतर जागा नाही. ज्यांनी पूर्वी प्लॉट घेतले, त्यावर कारखाने सुरू केले नाही. उलट ते प्लॉटवर पोटभाडेकरू नियुक्त करून पोट भरण्याचे उद्योग मात्र बिनबोभाट सुरू असताना त्याकडे औद्योगिक विकास महामंडळाकडून काणाडोळा या वर्षीदेखील झाला.

औद्योगीकरणामुळे प्रदूषण मंडळाने नोटिसा पाठविल्या, परंतु ठोस अशी कारवाई न झाल्याने प्रदूषण मंडळाचे काम संशयात सापडले. उद्योगांना सेस लावण्यात आल्याने या दुहेरी करातून त्यांची सुटका या वर्षी होवू शकली नाही. उद्योगांसाठी स्वतंत्र मलनिस्सारण केंद्र स्थापन करण्याचा प्रश्‍न प्रलंबित राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT