Jet Ski esakal
नाशिक

पर्यटनाला आली बहर, साहसी पर्यटनाची लहर

अरूण मलाणी

नाशिक : तप्त उन्‍हाळ्याने कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे. अशात शहरवासीयांसह अन्‍य विविध ठिकाणांहून नाशिकला पर्यटनासाठी आलेल्‍या पर्यटकांना गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात काहीशा गारव्‍याची अनुभूती मिळते आहे. येथील बोट क्‍लबला (Boat Club) भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. उन्‍हाळी सुटीमुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढता आहे. येथे पाण्याच्‍या लहरीवर स्‍वार होत साहसी पर्यटनाचा आनंद लुटताना अनेक पर्यटक बघायला मिळत आहेत. (Increasing response to MTDC boat club on Gangapur dam during summer vacation Nashik News)

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (MTDC) गंगापूर धरण परिसरात बोट क्‍लब चालविला जातो आहे. या प्रशस्‍त जागेत नौकानयनाचा आनंद लुटण्याची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे. क्रुझर जेटसह, बनाना राईड, क्रुझर शिप अशा विविध माध्यमातून नौकानयनाचा आनंद लुटला जातो आहे. एका व्‍यक्‍तीच्‍या राईडपासून सहा ते आठ जणांच्‍या समूहासाठी राईडचे पर्याय येथे उपलब्‍ध करून दिलेले आहे. त्यामुळे सहकुटुंब लहरीवर स्‍वार होताना आनंदोत्‍सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे. या उत्‍साहात सुरक्षेचे भान राखताना सहभागींना लाइफ जॅकेट हे सुरक्षिततेचा उपाय म्‍हणून घातले जात असते. या ठिकाणी दहा मिनिटांच्या लहान सफरपासून चाळीस मिनिटांपर्यंतच टूरदेखील घडविली जाते आहे. परिसरातच कॅन्‍टीन कार्यान्‍वित असून, येथील भव्‍य सभामंडपात बसून शांततेची अनुभूती अनेक पर्यटक घेता आहेत. या कॅन्‍टीनमुळे अल्पोपाहाराची सुविधादेखील झालेली आहे.

Tourists taking Selfie at MTDC Boat club

विकेंडला लक्षणीय गर्दी

सध्या उन्‍हाळी सुट्या सुरू असल्‍याने तसे तर रोजच पर्यटकांची वर्दळ बोट क्‍लब परिसरात असते. परंतु, शनिवार व रविवार अशा विकेंडला शासकीय व खासगी कार्यालये बंद असल्‍याने या दिवशी गर्दीत लक्षणीय वाढ होत असते. अनेक जण सहकुटुंब येथे फेर फटक्‍यासाठी येत असतात. तरुणाईची उपस्‍थितीदेखील लक्षवेधी ठरत असते.

"उन्‍हाळी सुट्यांमुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढता आहे. उन्‍हाळ्याच्‍या झळांपासून दिलासा मिळविण्यासाठी व साहसी पर्यटनाचा आनंद लुटण्याकडे अनेकांचा कल बघायला मिळतो आहे. वीक एंडला प्रतिसाद आणखी वाढत असतो." -दत्ता रेवणकर, बोट क्‍लब, एमटीडीसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT