court court
नाशिक

वाढता वाढता वाढे प्रलंबित खटले

वकील पॅनलची पुनर्रचना करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कनिष्ठ ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या न्यायालयांमध्ये महापालिकेचे प्रलंबित दाव्यांची संख्या वाढत असून, डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल दोन हजार ३९७ प्रलंबित दाव्यांची संख्या पोचली आहे. दावे निकाली काढण्यासाठी महापालिकेने वकील पॅनलची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १०७ वकिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या पॅनलवरील वकिलांना नवीन नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेशी संबंधित विविध दाव्यावर बाजू मांडण्यासाठी जिल्हास्तरापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत वकिलांची नियुक्ती केली जाते. सद्यःस्थितीत जिल्हा न्यायालयात १७, उच्च न्यायालयात ८ व सर्वोच्च न्यायालयासाठी दोन वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. दावा लढण्याच्या बदल्यात महापालिकेकडून मानधन देताना सुनावणीप्रमाणे शुल्क अदा केले जाते. सर्वोच्च न्यायालयात केस लढण्यासाठी एका सुनावणीचे तीस ते पन्नास हजार रुपये, उच्च न्यायालयासाठी वीस ते तीस हजार रुपये व जिल्हा न्यायालयासाठी पाच ते दहा हजार रुपये याप्रमाणे शुल्क आहे.

महापालिकेच्या दाव्यांचा वेगाने निकाल लागणे अपेक्षित असताना प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यातही महापालिकेच्या विरोधात निकाल लागण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. सध्या दोन हजार ३९७ दावे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. प्रलंबित दाव्यांची संख्या लक्षात घेता वकील पॅनलची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा न्यायालयासाठी ८७, उच्च न्यायालयासाठी बावीस अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा न्यायालयात सतरा, तर उच्च न्यायालयात आठ वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे.

असे आहेत प्रलंबित दावे

  1. सर्वोच्च न्यायालय- १०

  2. मुंबई उच्च न्यायालय- ७५३

  3. जिल्हा न्यायालय- १,५०९

  4. औरंगाबाद न्यायालय (वक्फ बोर्ड)- ११

  5. नागपूर न्यायालय- ३९

  6. कामगार व औद्योगिक न्यायालय- ७४

  7. एकूण प्रलंबित खटले - २,३९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT