Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik News | ज्ञानदीपमधील अत्याचार प्रकरणी आयोगाला स्वतंत्र अहवाल देणार : सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

सकाळ वृतसेवा

नाशिक : म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अत्याचार प्रकरणाची व त्या संबंधित असलेल्या शासकीय कार्यालयांना भेटी देत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सल्लागार व सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नाशिकमध्ये येत भेटी देत निरीक्षण नोंदविले.

यासंदर्भातील स्वतंत्र अहवाल दीक्षित हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सादर करणार आहेत भविष्यात अशा स्वरूपाची घटना घडू नये यासाठी या संदर्भातील उणिवा त्यांच्या अहवालात नमूद असण्याची शक्यता आहे. (Independent report to Commission on Gyandeep atrocities Retired Director General of Police Praveen Dixit Nashik News)

म्हसरुळ येथील द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानदिप गुरुकूल आश्रमात आश्रमचालक हर्षल मोरे याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मोरेविरोधात मसरूळ पोलिस ठाण्यात पोक्सो, ॲक्ट्रोसिटी, अत्याचाराचे गुन्हे दाखल करून त्यास अटक केली आहे. श्री. दीक्षित हे गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये आले आहेत, त्यांनी घटनेबाबत विविध शासकीय विभागांना भेटी दिल्या.

हर्षल मोरे याने आदिवासी मुलामुलींना एका रो हाऊस मध्ये आणून आश्रमशाळा सुरु केली होती. देणगीदारांकडून देणग्या घेत त्या जोरावर आर्थिक फायदा घेत होता तसेच मुलामुलींचे लैंगिक शोषण करत होता. अल्पवयीन मुलींनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

याप्रकरणी हर्षल मोरेविरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलिस तपास करीत आहेत. असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे एक पथक नेमण्यात आले असून दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहे.

श्री. दीक्षित यांनी नाशिकला येत आदिवासी विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ, धर्मदाय आयुक्तालय आदी शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधत या घटनेबाबत चर्चा केली. यातून समोर येणारी निरीक्षणे नोंदवून ते त्याचा अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगास सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT