नाशिक

जागतिक टपाल दिन विशेष

CD
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- लोगो...जागतिक टपाल दिन विशेष -- फोटो क्रमांक : 31722 - एआय इमेज -- ‘डिजिटल’च्याही प्रवासात ‘टपाल’वर विश्वास कायम! -- धुळे- नंदुरबारमध्ये सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना योजनांच्या लाभाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : एकेकाळी दूरवरच्या माणसाची खुशाली सांगणारी पत्रे, मनीऑर्डरमधून घराघरांपर्यंत पोहोचणारा आर्थिक आधार आणि गावागावांत विश्वासाचे नाते जपणारा पोस्टमन ही टपाल विभागाची खरी ओळख होती. काळ बदलला, संवादाची साधनेही बदलली. परंतु, टपाल विभागावरील सामान्यांचा दृढ विश्वास आजही कायम टिकून आहे. याच टपाल कार्यालयांच्या माध्यमातून आता बचत, विमा, पेन्शन, आधार नोंदणी आणि डिजिटल बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ३६ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत या सेवा पोहोचल्या असून, ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नागरिकांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाकघर अधीक्षक संजय ताठे यांनी केले. - धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांत टपाल विभागाचे व्यापक जाळे कार्यरत आहे. यात एक मुख्य टपाल कार्यालय, ५५ उपटपाल कार्यालये आणि ४५३ ग्रामीण शाखा टपाल कार्यालये, अशा एकूण ५०९ कार्यालयांच्या माध्यमातून विविध सेवा विनाअडथळा दिल्या जात आहेत. शहरांबरोबरच ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे जवळचे टपाल कार्यालय आर्थिक व्यवहारांचे विश्वासार्ह केंद्र बनले आहे. - बचतीतून भविष्याची तरतूद भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी टपाल विभागाच्या विविध बचत योजना उपयुक्त ठरत आहेत. धुळे विभागात सध्या पाच लाख ५१ हजार ६६८ आवर्ती ठेव (आरडी) खातेदार, एक लाख ६३ हजार ६८८ बचत खातेधारक आणि ८४ हजार ७०९ मुदत ठेव खातेदार नोंदणीकृत आहेत. शिवाय मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ७३ हजार १५३ सुकन्या समृद्धी खातेधारक, १६ हजार ५४३ मासिक उत्पन्न योजना खातेदार, १६ हजार ३१८ ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातेदार आणि १३ हजार ४०० सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातेदार सक्रिय आहेत. टपाल जीवन विम्याच्या १६ हजार ५१९ पॉलिसींची नोंद आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ विम्यापासून बँकिंगपर्यंत आधुनिक सेवा कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना उपलब्ध आहेत. विभागात विमा योजनांच्या ८३ हजार ९०७ हून अधिक पॉलिसी सक्रिय आहेत. दरम्यान, आता पत्रे आणि पार्सलसोबतच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून घरपोच बँकिंग सेवा, आधार नोंदणी व अद्ययावतीकरण, पासपोर्ट सेवा केंद्र आणि स्पीड पोस्टची सुविधा मिळत आहे. यंदा ‘एक टपाल जाळे, अमर्याद संधी’ ही जागतिक टपाल दिनाची संकल्पना असून, नागरिकांनी जवळच्या कार्यालयाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ताठे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT