KANDA
KANDA sakal
नाशिक

इजिप्त, तुर्कस्तान अन्‌ पाकच्या दराच्या स्पर्धेत भारतीय कांदा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लाल कांद्याची आवक वाढत असताना भाव किलोला १८ ते २४ रुपयांपर्यंत पोचताच, भारतीय कांदा इजिप्त, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या कांद्याच्या भावाच्या स्पर्धेत पोचला आहे. त्याचा परिणाम म्हणजे, मलेशियासह सिंगापूरमधून निर्यातदारांकडे इन्क्वायरी वाढली आहे. आर्द्रता कमी असलेला तयार लाल कांद्याची आवक वाढताच, विशेषतः दुबईमध्ये अरब राष्ट्रांच्या बाजारपेठेसाठी पाकिस्तानच्या कांद्याशी टक्कर देणे शक्य होत असताना भाव कोसळण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल, असा निर्यातदारांचा अंदाज आहे.

लासलगावमध्ये शुक्रवारी (ता. १०) लाल कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव दोन हजार ६०० रुपये राहिला. पिंपळगावमध्ये दोन हजार ५५१ रुपये क्विंटल भावाने विक्री झाली होती. मंगळवारी (ता. १४) लासलगाव आणि पिंपळगावमध्ये दोन हजार ३५१ रुपये असा भाव मिळाला. लाल कांद्याच्या भावात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असताना आयातदारांकडून मागणी वाढू लागल्याने निर्यातीचा वेग वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कांद्याचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची निर्यात वाढणे महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी देशातून दोन हजार ८०० कोटींच्या १५ लाख ७५ हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यात महाराष्ट्रातील दीड हजार कोटींच्या आठ लाख टन कांद्याचा समावेश होता.

यंदा देशात ११ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाल्यास २२० लाख टन उत्पादन मिळण्याचा अंदाज श्री. चव्हाण यांनी बांधला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातून ३१ टक्के कमी म्हणजेच, आठ लाख ९९ हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यात महाराष्ट्रातील चार लाख टन, पश्‍चिम बंगालमधील तीन लाख २० हजार आणि ७५ हजार टन तमिळनाडूतील कांद्याचा समावेश राहिला आहे.

कांद्याच्या निर्यातीचा भाव (आकडे टनाला डॉलरमध्ये दर्शवतात)

दुबईमध्ये

इराण आणि तुर्कस्तान-४००

इजिप्त-३५०,

भारत-४४०

भारतीय कांदा

सिंगापूरसाठी-४६०

मलेशियासाठी-४२०

श्रीलंकेसाठी-४८० ते ४९० (वातानुकूलित कंटेनरचा वापर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT