Indian Railway esakal
नाशिक

अबब...! रेल्वे प्रशासनाने वसूल केला 8.5 कोटींचा दंड

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भुसावळ मंडळात नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध तिकीट तपासणीत तब्बल एक लाख ६ हजार ४३४ फुकट्या प्रवाशांकडून ८.६४ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.

फुकट्यांमुळे वाचला रेल्वेचा मोठा महसुल तोटा

रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासनिसाला चकवून तिकीट न काढताच प्रवास करण्याचा ‘उद्योग’ करणारी मंडळीची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत आहे. रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवासी रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात तपासणी मोहीम राबवण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून तसेच, रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून जाते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य विभाग भुसावळ मंडळाला तिकीट तपासणीतून ८.६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात या कालावधीत १ लाख ६ हजार ४३४ अनियमित, विनातिकीट प्रवास प्रकरणे पकडली आहेत. ज्यातून ८.६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भुसावळ मंडळाने मागील तपासणी मोहिमेत ६.०८ कोटी मिळविले होते. मात्र, यावर्षी ८.६४ कोटी रुपये मिळवत अधिक नफा कमावला आहे. तिकीट तपासणी उत्पन्नात एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केल्यामुळे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

भुसावळ विभागातील जंक्शन

नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, खंडवा, शेगाव, अकोला.

नियमाचे पालन करण्याचे आवाहन

फुकट प्रवास करणाऱ्यांना दंड करून रेल्वेचा बुडणारा महसूल जमा केला आहे. ज्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल तोटा वाचला आहे. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविडसाठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज! कितीने वाढणार पगार?

Karnataka Heavy Rain Alert : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Indians ने रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करावे! IPL 2027 पूर्वी भारताच्या महान खेळाडूची मागणी, हार्दिक पांड्याचं भविष्य...

...म्हणून मंदिरात जीन्स परिधान केली; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा, ‘त्या’ ठिकाणी जाऊन घेतलं दर्शन

दिवाळीच्या मेकअपआधी त्वचेची घ्या अशी काळजी! फॉलो करा सेलिब्रिटी डायटिशिअन रुजुता दिवेकरांच्या ४ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT