नाशिक

गोसेवा आयोगाच्‍या मुंदडांनी दिली मुक्‍त विद्यापीठास भेट

CD
गोसेवा आयोगाच्‍या मुंदडांनी दिली मुक्‍त विद्यापीठास भेट देशी गोवंश संवर्धन- प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावित आराखड्याची पाहणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३०ः देशी गोवंशाचे संवर्धन, शास्त्रीय पद्धतीने संगोपन तसेच पशुपालकांना आधुनिक पशुपालनाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देशी गोसंगोपन व प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त तथा आयोगाचे सदस्य सचिव डॉ. श्यामकांत पाटील यांनी विद्यापीठास भेट देत प्रस्तावित केंद्राच्या आराखड्याची पाहणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठास भेट देत प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. या केंद्राद्वारे देशी गोवंशाचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन, योग्य व्यवस्थापन, पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गोआधारित शेतीविषयक ज्ञानाचा प्रसारावर भर दिला जाईल. तसेच कृषी विज्ञानाच्या माध्यमातून पशुपालकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे देशी गोवंश संवर्धनाला चालना मिळण्यासह पशुपालकांना शास्त्रीय पशुपालन पद्धतींची माहिती उपलब्ध होईल. या प्रकल्पातून देशी गोवंश संवर्धन व शास्त्रीय गोसंगोपनाला प्रोत्साहन मिळेल. या दृष्टीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून प्रकल्पास आवश्यक सहकार्य केले जाणार असल्‍याचे आश्वासन आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य सचिव डॉ. श्यामकांत पाटील यांनी दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नितीन ठोके, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. श्याम पाटील, राजाराम पाटील, हेमराज राजपूत, डॉ. प्रकाश कदम आणि मंगेश व्यवहारे उपस्थित होते.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT