Aviation Services Update esakal
नाशिक

Aviation Services : इंडिगो, स्पाइस जेटचे मार्चचे शेड्यूल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकहून (ओझर) विमानतळावरून इंडिगो व स्पाइस जेट या विमान कंपन्यांनी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, गोवा, हैदराबाद, नागपूर व बंगलोरसाठी मार्च महिन्याचे विमान सेवेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

इंडिगो कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात हैदराबादहून सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी नाशिकसाठी विमान उड्डाण करेल. सकाळी ८.२५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान उतरेल. रात्री पावणेदहाला हैदराबादसाठी उड्डाण झाल्यानंतर हैदराबाद विमानतळावर रात्री ११.४० मिनिटांनी विमान उतरेल. (Indigo Spice Jet schedule announced for March Seven days service for Delhi Ahmedabad Pune Goa Hyderabad Nagpur Bangalore Nashik News )

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

नाशिकहून सकाळी ९.१५ मिनिटांनी गोव्यासाठी (मोपा) विमानाचे उड्डाण होईल. सकाळी ११. २० मिनिटांनी गोवा विमानतळावर विमान उतरेल. गोव्यावरून सकाळी ११. ४० मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल व दुपारी १.३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान उतरेल.

ओझर तळावरून १. ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी विमानसेवा राहील. अहमदाबादला ३.२० मिनिटांनी विमान पोहचेल. पुन्हा अहमदाबादहून ३.४० मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. ओझर विमानतळावर ५. ५ मिनिटांनी विमान पोचेल.

५.२५ मिनिटांनी नागपूरसाठी ओझर तळावरून उड्डाण होईल. नागपूरला ७. १५ मिनिटांनी विमान पोचेल. नागपूरहून ७. ३५ मिनिटांनी नाशिकसाठी उड्डाण होईल व ९.२५ मिनिटांनी ओझर तळावर विमान उतरेल.

बंगलोर, नागपूरसाठी उड्डाण

स्पाइस जेट कंपनीने जाहीर केलेल्या मार्च महिन्याच्या शेड्यूलमध्ये दिल्लीहून १२. ३५ मिनिटांनी नाशिकसाठी उड्डाण होईल. २.२० मिनिटांनी ओझर विमानतळावर विमानाचे लँडिंग होईल. ओझरवरून २.५० मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण होईल व सायंकाळी ४. ४० मिनिटांनी विमान उतरेल. सकाळी ६. २० मिनिटांनी हैदराबाद होऊन नाशिकसाठी उड्डाण होईल. सकाळी ७. ५५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान पोचेल.

नाशिकहून ८. २० मिनिटांनी हैदराबादसाठी उड्डाण होईल. हैदराबादला ९. ५५ मिनिटांनी विमान पोचेल. बंगलोर होऊन सकाळी ७. ५५ मिनिटांनी नाशिकसाठी उड्डाण होईल. नाशिकला १०.५ मिनिटांनी विमान पोचेल, तर नाशिकहून संध्याकाळी ६ वाजता बंगलोरसाठी उड्डाण होऊन रात्री ८. १० मिनिटांनी बंगलोर येथे विमान पोचेल.

नाशिकहून सकाळी १०. २५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण होईल व १२ वाजता विमान पोचेल. अहमदाबादहून पुन्हा १२. ३० मिनिटांनी नाशिकसाठी उड्डाण होईल व २.५ मिनिटांनी विमान पोचेल. नाशिकहून २. २५ मिनिटांनी गोव्यासाठी उड्डाण होईल. गोवा येथे दुपारी साडेतीन वाजता विमान पोचेल. त्याचप्रमाणे गोव्याहून दुपारी साडेचार वाजता नाशिकसाठी उड्डाण होईल. ५. ४० मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान पोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT