नाशिक

रस्त्यात बसेस थांबवून सिटी लिंक चालका ंची देवाण-घेवाण

CD
फोटो : B13005 इंदिरानगर : रस्त्यात बस उभ्या करून देवाण-घेवाण करताना चालक. ​-- भररस्त्यात बस उभ्या करून गप्पा इंदिरानगरमध्ये सिटीलिंक चालकांचा बेशिस्तपणा इंदिरानगर, ता. २६ : शनिवारी (ता. २४) विनयनगर चौकात सिटीलिंक बसच्या भरधाव वेगामुळे वाहकच खाली पडल्याची घटना ताजी असताना सोमवारी (ता. २६) पुन्हा रथचक्र चौक परिसरात निवांत गाड्या उभ्या करून गप्पा आणि देवाणघेवाण करणाऱ्या चालकांना बघून इंदिरानगरवासीयांनी कपाळावर हात मारून घेतला आहे. भररस्त्यात वाहने उभी करून गप्पा मारण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बसमधून पडलेला वाहक गंभीर जखमी झाला होता. आता पुन्हा रस्त्याच्या मधोमध बस उभ्या करून वाहतूक अडवण्याचा प्रकार समोर आला. बस उभ्या करून, गप्पा मारून आणि काहीतरी देवाणघेवाण करून मार्गस्थ होईपर्यंत नागरिकांना या बसला वळसा घालून मार्गस्थ व्हावे लागले. एका बाजूला रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना कसरत करावी लागत होती, तर दुसऱ्या बाजूला बसमध्ये बसलेले नागरिक बस कधी पुढे निघणार, या प्रतीक्षेत होते. या बेशिस्तपणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

SCROLL FOR NEXT