Water falling into society tank at low pressure esakal
नाशिक

Nashik Water Shortage: इंदिरानगरमध्ये कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : ऐन पावसाळ्यात इंदिरानगरमध्ये कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहे. कुठे मातीमिश्रित पाणी, तर कुठे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना खासगी टँकरद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे.

संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली तर तेदेखील मनावर घेत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Indiranagar citizens worried about artificial water shortage nashik news)

मागील आठवड्यात विनयनगर परिसरातील श्री सप्तशृंगी देवी मंदिर परिसर, श्री कपालेश्वर अपार्टमेंट आदी परिसरात पाइपलाइनमधून गटारमिश्रीत पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी तक्रार करून फोन केले, पाठपुरावा केला. मात्र, पाणीपुरवठा विभाग ड्रेनेज विभागाकडे बोट दाखवतो. समस्या मात्र जैसे थे, अशी स्थिती आहे.

अखेर जाधव यांनी स्वतः ड्रेनेज साफ करून घेतले. मात्र अजूनही समस्या पूर्णतः सुटलेली नाही. सध्या येथे काम सुरू असून मनपातर्फे येथे टँकर पाठवावा लागत आहे. कलानगर चौकात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या भागात असलेल्या श्री जी टॉवर सोसायटीत १५० सदनिका आहेत. मात्र, करंगळीएवढी धार पाण्याला असल्याने अवघे हजार दोन हजार लिटर पाणी या सोसायटीच्या टाकीमध्ये जमा होते. त्यामुळे दररोज खासगी टँकरद्वारे येथील रहिवाशांना तहान भागवावी लागत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याचे या भागातील नागरिक सांगतात. विशेष म्हणजे या भागातूनदेखील संबंधितांना फोन केले तर ते फोनच उचलत नाहीत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते ह्णषीकेश वर्मा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा ‘हे’ क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT