३६-२
‘इंद्रधनुष्य’ची प्राथमिक
निवड चाचणी स्पर्धा
आरोग्य विद्यापीठ ः महाविद्यालये सहभागी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ः राज्यस्तरीय सांस्कृतिक युवक महोत्सव ’इंद्रधनुष्य’साठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतर- विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी विविध कला प्रकारातील महाविद्यालयांच्या संघांनी सादरीकरण केले.
''इंद्रधनुष्य २०२६'' स्पर्धेसाठी निवड चाचणीत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, योगिता पाटील यांनी अभिनंदन केले.
‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. विद्यापीठ मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत आयोजित उद्घाटन कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते. परीक्षणासाठी पूनम पाटील, महेश डोकफोडे, पूजा कुलकर्णी, भाग्यश्री गुजर, ॲड. अश्विनी देशपांडे, दीपक वर्मा, राजा पाटेकर, संज्योती देवरे, डॉ. स्वप्नील तोरणे यांनी जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नृत्य, साहित्य कला, नाट्य, कला, ललित कला आदी कला प्रकारांचा समावेश आहे. इंद्रधनुष्य २०२६ अंतिम स्पर्धा १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.