नाशिक

मुक्त विद्यापीठात उद्यापासून ''इंद्रधनुष्य''

CD
मुक्त विद्यापीठात उद्यापासून ‘इंद्रधनुष्य’ कविवर्य कुसुमाग्रज नगरीत पाच दिवस रंगणार सांस्कृतिक महाकुंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे बाविसावा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२६ चे आयोजन केले आहे. गुरुवार (ता.१९) पासून सोमवार (ता.२३) पर्यंत आयोजित या युवा सांस्कृतिक महाकुंभामध्ये राज्‍यातील २७ विद्यापीठांचे ४८६ विद्यार्थिनी, ६३७ विद्यार्थी असे एकूण १ हजार १२३ युवा कलावंत आणि संघव्यवस्थापकासह जवळपास १ हजार २५० व्‍यक्‍ती सहभागी होणार आहेत. स्‍पर्धेच्‍या अनुषंगाने विद्यापीठ प्रांगणात खास कविवर्य कुसुमाग्रज नगरी उभारली आहे. यातील ‘गोदावरी मंडपम’ या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे व मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले उपस्थित राहातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची उपस्थिती असेल. यासाठी विद्यापीठ प्रांगणात ‘चित्रमहर्षी दादासाहेब फाळके मंच’, ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंच’, ‘प्रा. वसंत कानेटकर मंच’, ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मंच’, व ''शिल्पकार राम सुतार मंच'' सज्ज केले आहेत. यामध्ये संगीत, नृत्य, वाड्मयीन, रंगमंचीय कला विभाग, ललित कला, लघुपट व शोभायात्रा अशा सात प्रमुख कला प्रकारांअंतर्गत विविध २९ स्पर्धा होतील. महोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेसातला ज्ञानस्त्रोत केंद्र ग्रंथालय ते यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. औपचारिक उद्‌घाटन सकाळी अकराला होईल. पहिल्या दिवशी भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद आणि सुगमसंगीत स्पर्धांचे सूर निनादणार आहेत. शुक्रवारी (ता.२०) भारतीय समूहगान, पाश्चिमात्य गायन व वाद्यसंगीत, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, मातीकला, चिकटकला, रांगोळी आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीची रंगत दिसेल. शनिवारी (ता.२१) भारतीय शास्त्रीय नृत्य, नाट्यसंगीत, एकांकिका, वादविवाद स्पर्धा, व्यंगचित्रे, पोस्टर मेकिंग, पाश्चिमात्य समूहगान, शास्त्रीय तालवाद्य, लघुपट, स्थळ चित्र आणि मूकभिनय यांसारख्या वैविध्यपूर्ण कलाप्रकारांची मेजवानी रसिकांना अनुभवता येईल. रविवारी (ता.२२) भारतीय लोकसमूह नृत्य, शास्त्रीय गायन व स्वरवाद्य, प्रहसन, स्थापना, स्थळ छायाचित्रण आणि नकला या स्पर्धा होतील. सोमवारी (ता.२३) सकाळी अकरापासून चित्रमहर्षी दादासाहेब फाळके मंचावर समारोप व बक्षिस वितरण समारंभ होईल. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी आयोजन, स्वागत, उद्घाटन व समारोप, भोजन, निवास, आरोग्य, सुरक्षा, वित्त, परीक्षण आदी विविध जबाबदाऱ्यांसाठी एकूण ४२ समित्या गठित केल्‍या आहेत. त्याअनुषंगाने लोकभवनच्या निरीक्षण व वित्त समितीने विद्यापीठास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT