District Superintendent of Police Sachin Patil handing over the Wonder Book of Records certificate to Warli painter Shraddha Karale, ami tease.
District Superintendent of Police Sachin Patil handing over the Wonder Book of Records certificate to Warli painter Shraddha Karale, ami tease. esakal
नाशिक

वारली चित्रकलेची मोडी लिपीत माहिती; श्रद्धा कराळे यांनी नोंदविला रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी दिनानिमित्त वारली चित्रकलेचा इतिहास सर्वसामान्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांनी अनोखा उपक्रम राबविला होता. त्‍यांनी ७५ लेखांमध्ये वारली चित्रकलेविषयीची माहिती मोडी लिपीत लिहिली होती. या उपक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. (Information on Warli painting in Modi script Record recorded by artist Shraddha Karale nashik Latest Marathi News)

यापूर्वी श्रद्धा कराळे यांनी वारली चित्रकृतीच्‍या प्रचार व प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. यंदा आदिवासी दिनानिमित्त ७५ लेखांमध्ये वारली चित्रकलेविषयीची माहिती मोडी लिपीत लिहिण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला आहे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सव साजरे होत असताना ७५ भागांमध्ये लेखाची विभागणी केली.

या प्रयोगाची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. यासंबंधीचे प्रमाणपत्र जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्‍या हस्‍ते श्रद्धा कराळे यांना प्रदान करण्यात आले. वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षिका अमी छेडा उपस्थित होत्या.

मोडीसारख्या लिपीमध्ये अजून खूप काम होण्याची आवश्‍यकता आहे. विशेषतः तरुण पिढीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरच ही पुरातन ठेवा असलेली लिपी जतन होईल, अशी भावना अमी छेडा यांनी या वेळी व्‍यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT