rajesh tope Sakal
नाशिक

त्रुटी आढळल्यास माहिती मागविण्यात येईल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कठडा येथील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत चौकशीअंती ठेकेदारांना दंड करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून चौकशीत त्रुटी आढळून आल्यास पुन्हा सविस्तर माहिती मागविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला टाक्यांमध्ये ऑक्सिजन भरताना गळती झाली. त्यात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २२ रुग्णांचा नाहक बळी गेली होता. घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. पंधरा दिवसात समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर महापालिकेने तायो निप्पॉन व जाधव एंटरप्राइजेस कंपनीवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला. ऑक्सिजन भरताना कंपनीचे अधिकारी जागेवर राहणे बंधनकारक होते,

तसेच दुर्घटना घडल्यानंतर पंधरा दिवसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधल्याने बावीस लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंडात्मक रक्कम अद्याप वसूल झाली नाही. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. १९) आरोग्यमंत्री टोपे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना महापालिका, तसेच विभागीय आयुक्तांच्या समितीकडून पुन्हा चौकशी अहवाल मागवून तपासणी करू, तपासणी पारदर्शक झाली नसल्यास संबंधितांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. दरम्यान पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात विनानिविदा औषधे खरेदी केले जात असल्याने महापालिकेला औषधे खरेदीचे नियम पाळण्याचा सल्ला देताना अनियमितता आढळून आल्यास चौकशीला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. टोपे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT