Suyog Tade showing hand injured in cat attack esakal
नाशिक

Nashik News : मांजराला दूध पाजणे पडले महागात; 20 इंजेक्शन घेण्याची वेळ

आतापर्यंत मोकाट कुत्र्याने चावा घेऊन अनेकांना जखमी केल्याच्या घटना आपण ऐकल्या आणि बघितल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आतापर्यंत मोकाट कुत्र्याने चावा घेऊन अनेकांना जखमी केल्याच्या घटना आपण ऐकल्या आणि बघितल्या आहेत.

मात्र इंदिरानगरमध्ये एका मांजराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी होण्याची वेळ सुयोग ताडे यांच्यावर आली आहे.(Injured by cat attack and Time to take 20 injection nashik news)

सोसायटीमध्ये फिरणाऱ्या मांजराला दूध पाजणे ताडे यांना चांगलेच महागात पडले असून, या मांजरीने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून, गेल्या दहा दिवसांपासून ते शासकीय रुग्णालयात या संबंधित उपचार करून घेत आहेत.

वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये ताडे राहतात. या ठिकाणी या मांजरीचा नेहमीचा वावर होता. तिने पिलेदेखील येथे जन्माला घातली होती. त्यामुळे ताडे या मांजराला आठवणीने दूध द्यायचे.

१४ डिसेंबरला नेहमीप्रमाणे ही मांजर दिसल्यावर त्यांनी तिच्यासमोर दूध ठेवले आणि अचानक या मांजरीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला तिने १५ ते १६ ठिकाणी पायांनी बुचकारले तर चार ते पाच ठिकाणी चावा घेतला. रक्तबंबाळ झाल्याने शासकीय रुग्णालयात त्यांनी धाव घेतली.

एकंदर परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना यासाठी आवश्यक असलेले वीस इंजेक्शन्स घ्यावे लागतील, असे सांगितले आहे. त्यातील १८ पूर्ण झाले असून दोन इंजेक्शन घेणे शिल्लक आहेत. अचानक झालेल्या या प्रकाराने नागरिक मात्र भयभीत झाले असून, रस्त्याने दिसणाऱ्या मांजर तसेच कुत्र्यांपासून दोन हात लांब राहा अशा सूचना देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT