नाशिक

खमी महिलेला बारा लाखांची नुकसान भरपाइचे आ

CD
जखमी महिलेला साडेबारा लाख नुकसानभरपाईचे आदेश ‘न्यायालय आपल्या दारी उपक्रम’; एसटीचालकाचा ‘व्हीसी’द्वारे घेतला जबाब सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : वाघळू (ता. चाळीसगाव) येथील झामाबाई पोपट पाटील या वयस्कर महिला एसटी बसच्या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणात त्यांना १२ लाख ५७ हजार ३२८ रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश मेंबर मोटर अपघात न्यायालय आर. एन. जोशी (जळगाव) यांनी एसटी महामंडळाला दिला. चाळीसगाव बसस्थानकात २५ ऑक्टोबर २०२४ ला एसटी बस (एमएच ०६, एस ८९७५) चालक योगेश प्रकाश चिमणकर (रा. सातपूर, नाशिक) याने निष्काळजीपणे बस चालवून पायी जाणाऱ्या झामाबाई पोपट पाटील (रा. वाघळू) यांना धडक दिली. अपघातात त्यांचा उजवा पाय चेंदामेंदा झाला, तर उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांना त्यांचा तळपाय कापावा लागला. प्रकृतीमुळे न्यायालयात जाता न आल्याने मुलगा सुरेश पोपट पाटील याने अर्ज दाखल केला. अर्जदार महिलेवरील आक्षेप तिचे वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी फेटाळून लावले. वयस्करपणा, गंभीर जखमी आणि मेडिकल बोर्डाने घोषित केलेले ५० टक्के कायमस्वरूपी अपंगत्व यामुळे तिला न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याची बाजू त्यांनी मांडली. चौकट भरपाई ३० दिवसांत देण्याचे निर्देश कागदपत्रे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कोर्ट कमिशनर म्हणून ॲड. श्वेता घोलप यांची नियुक्ती केली. तसेच एसटी महामंडळाने झामाबाई पाटील यांना १२ लाख ५७ हजार ३२८ रुपये नुकसानभरपाई आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांत देण्याचे निर्देश दिले. अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT