Ink Thrown on Doctor Nashik 
नाशिक

Manoj Jarange: जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट! संभाजी ब्रिगेडकडून डॉक्टरवर शाईफेक

अचानक घडलेल्या या प्रकाराची नाशिकमध्ये चर्चा होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी नाशिकमधील डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून हा प्रकार करण्यात आला आहे. यामुळं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलंय?

मनोज जरांगे यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या नाशिक येथील डॉक्टरच्या अंगावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून शाई टाकून निषेध करण्यात आला. जरांगेंच्या सगेसोयरे विषयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. नाशिकच्या सिडको भागातील आयुर्वेदिक डॉक्टर विजय गवळी यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडकडून हा प्रकार करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडचं म्हणणं काय?

डॉ. प्रदीप गवळी यांनी अत्यंत आक्षेपार्ह लिखाण त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून जरांगें पाटलांवर केलं होतं. त्यांनी इतिहासातील एका संदर्भानं आक्षेपार्ह लिखाण केलं होतं. पण ते आमच्या वडिलांच्या वयाचे असल्यानं आम्ही कुठलंही टोकाचं कृत्य केलेलं नाही. त्यांच्याशी साधक बाधक चर्चा करुन प्राथमिक स्वरुपात त्यांच्याविरोधात निषेध नोंदवला आहे.

या गवळी सारख्या प्रवृत्तीला जरब बसावी म्हणून हे कृत्य केलं होतं. पुन्हा त्यांच्याकडून अशा प्रकारचं कृत्य होऊ नये, म्हणून आम्ही शाईफेकचं कृत्य केलं आहे. याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आमची माफी देखील मागितलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT