नाशिक

नावीन्यपूर्ण विचार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा

CD
फोटो -NSK26H34466 नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आविष्कार २०२६’ विभागीय स्पर्धेप्रसंगी बोलताना डॉ. राम कुलकर्णी. शेजारी डॉ. नूतन सदगीर, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, डॉ. पी. जे. पवार, डॉ. रवींद्र मुंजे. नावीन्यपूर्ण विचार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा ----------------------------- डॉ. कुलकर्णी : ‘आविष्कार’ स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार हे केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता ते समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावेत. नावीन्यपूर्ण विचारांचा उपयोग वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, समृद्ध आणि उद्देशपूर्ण व्हावे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्थेत नुकताच ‘आविष्कार २०२६’ या विभागीय संशोधन स्पर्धा पार पडल्या, त्या प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी प्रमुख पाहुणे डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार केला. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिनिधी डॉ. नूतन सदगीर, महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. पी. जे. पवार, डॉ. रवींद्र मुंजे हे उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत वाणिज्य, व्यवस्थापन व विधी तसेच औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय विज्ञान या दोन श्रेणींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण केले. प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धक विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र मुंजे यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे स्वरूप व नियमावली बाबत माहिती दिली. डॉ. नूतन सदगीर यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT