अँकर
---
NSK26H34681
पिंपळगाव बसवंत : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला स्मशानभूमीत केलेली विद्युत रोषणाई.
राजेंद्र पवार : NSK26H34682
---
पिंपळगाव बसवंतच्या स्मशानभूमीत अभिनव दिवाळी
आकर्षक रांगोळीसह रंगीत दिव्यांच्या रोषणाईचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ७ : स्मशानभूमीबद्दलच्या पारंपरिक गैरसमजांना फाटा देत गेल्या काही वर्षांपासून येथील स्मशानभूमीत अभिनव पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. दीपावलीनिमित्त आकाशकंदील, विविध रंगांच्या आकर्षक रांगोळीसह रंगीत दिव्यांची सुशोभित रोषणाई वसुबारसपासून स्मशानात करण्यात येत असते. त्यामुळे स्मशानभूमीचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आहे.
स्मशानभूमीबाबत प्राचीन काळापासून मानवी मनात अनेक भीती आणि अंधश्रद्धा निर्माण केल्या गेल्या आहेत. आज तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीमुळे चंद्र, मंगळ ग्रहावरील मानवाच्या स्वारीने अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळाली आहेत. त्यामुळे जुन्या प्राचीन अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या गोष्टींना आजचे विज्ञान युग मूठमाती देत आहे. असाच काहीसा अनुभव पिंपळगाव बसवंतचे नागरिक गेल्या दहा वर्षापासून दिवाळीच्या कालावधीत ग्रामपंचायत, तर सध्या नगर परिषदेच्या परवानगीने स्मशानभूमी विविध रंगाची आकर्षक रांगोळी आणि रंगीत दिव्यांच्या रोषणाईने सुशोभित होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव पिंपळगावकर घेत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील निफाड रोडवरील पिंपळगाव बसवंत- बेहेड फाट्याजवळ पाराशरी नदीकाठावरील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात येते. त्यानंतर विद्युत रोषणाईसह आकाशकंदील लावून स्मशानभूमी सुशोभित केली जाते. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार त्यासाठी पुढाकार घेतात.
---
कोट
स्मशानभूमीविषयी माणसांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा दूर व्हावी. विज्ञान युगात जगताना पूर्वग्रह, अंधश्रद्धा नाहीशी व्हावी, या जाणिवेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहोत.
- राजेंद्र पवार,
सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.