नाशिक

शिक्षणाधिकारी सामलेटी यांच्या चौकशीला विलंब

CD
शिक्षणाधिकारी सामलेटी यांच्या चौकशीला विलंब चौकशी अहवाल येण्यापूर्वी नियुक्तीस सीईओंचा विरोध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने अद्याप चौकशीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊन अहवाल कधी प्राप्त होणार आणि त्यांना पुन्हा नियुक्ती होणार की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी सामलेटी यांच्याविषयी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यापर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्याची दखल घेत सीईओ पवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना रजेवर पाठविले. त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष), शिक्षणाधिकारी (योजना) आणि बांधकाम विभाग क्रमांक ३ चे वरिष्ठ सहायक (लिपिक) यांची समिती स्थापन केली. समितीने अर्जातील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल तयार करण्यासाठी वरिष्ठ सहायक विशाल कामडी यांच्यावर कामकाजाची जबाबदारी सोपविली. मात्र, या समितीने अद्याप चौकशी सुरूच केलेली नाही. अहवाल प्राप्त होऊन त्याची कार्यवाही करण्यास बरेच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यातच साईलता सामलेटी यांनी हजर होण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे समजते. मात्र, त्यांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वी हजर होण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे साईलता सामलेटी शिक्षणाधिकारी म्हणून पुन्हा पदावर येण्याची शक्यता मावळत चालली आहे. अतिरिक्त सीईओ करणार चौकशी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिभा संगमनेरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी सामलेटी यांची चौकशी नवीन अधिकारी करण्याची शक्यता वर्तविली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Sugars : सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी अखेर फुटली; शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करताच स्वाभिमानीचे आंदोलन पाच दिवस स्थगित

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT