police commissionerate Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : पोलिस ठाण्यासाठी निरीक्षकांची आयुक्तांकडे ‘लॉबिंग’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस निरीक्षकांच्या ‘फेऱ्या’ वाढल्याचे दिसून येते आहे. त्यावरून काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात या फेऱ्या मारणाऱ्यांमागेही कारण तसेच असून, येत्या काही दिवसात काही पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांच्या पदोन्नतीवर तर काहींच्या बदल्या अपेक्षित आहेत. त्यामुळे आयुक्तालयात वा पोलिस ठाण्यांमध्ये दुय्यम पदावर कार्यरत पोलिस निरीक्षक आत्तापासूनच पोलिस आयुक्तांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर, काही दुसऱ्या मार्गाने ‘लॉबिंग’ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Inspectors lobbying to commissioner for police station Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

गेल्या आठवड्यात शासनाने पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षकांच्या सहायक आयुक्तपदी पदोन्नतीने बदल्या आहेत. तर काही पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या केल्या. येत्या काही दिवसात आणखीही निरीक्षकांना पदोन्नती वा बदल्या होणार आहेत. गेल्या आठवड्यातील बदल्यांनुसार पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांची पदोन्नतीने सहायक आयुक्तपदी बदली जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले, विशेष शाखेचे निरीक्षक कुमार चौधरी यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना मुक्त करण्यात आलेले नाही.

दरम्यान, येत्या काळात होणाऱ्या या रिक्त पदांवर वर्णी लागावी, यासाठी पोलिस निरीक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आयुक्तालयातील विविध विभागात बरेच निरीक्षक सेवा बजावत आहेत. तर ठाण्यांमध्येही दुय्यम पदावर असलेल्या निरीक्षकांनाही वरिष्ठ निरीक्षक होण्यासाठीचे वेध लागले आहेत. अशा काही निरीक्षकांच्या या ना त्या कारणाने आयुक्तालयात फेऱ्या वाढल्या आहेत. काहींनी आयुक्त जयंत नाईकनवरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ‘इच्छा’ही बोलून दाखविली आहे. तर काहींनी आपला दावा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरी काही निरीक्षक हे राजकीय वजन वापरून ‘लॉबिंग’ लावण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणाच्या अपेक्षापूर्ती होते, याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT