लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार
‘इन्स्टा’वरील ओळखीतून जवळीक पडली महागात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : ‘इन्स्टाग्राम’द्वारे ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व सध्या जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय पीडित तरुणीची ‘इन्स्टाग्राम’वर आकाश गजानन चव्हाण (वय ३५, रा. बोरगावमंजू, जि. अकोला, सध्या रा. चित्रकूट, मध्य प्रदेश) याच्याशी ओळख झाली होती. संशयित आकाश याने पीडितेला लग्नाचे वचन देत प्रेमव्यक्त केले.
हॉटेलवर नेऊन शोषण
त्यानंतर २२ नोव्हेंबरला जळगाव शहरातील सहारा हॉटेल तसेच १५ ऑगस्टला नाशिक येथील टाऊन हाऊस हॉटेल येथे पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले.
चौकट
गुन्हा दाखल
पीडित तरुणीने शनिवारी (ता.३) जळगाव शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून संशयित आकाश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनेची माहिती घेत तपासाधिकारी उपनिरीक्षक सावित्री ढगे यांना तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.