kharif
kharif  Google
नाशिक

पावसाच्या ओढीमुळे यंदाचा खरीप हंगाम लांबणार

महेंद्र महाजन

नाशिक : मृग नक्षत्राला सुरवात होऊन आठवडा उलटला, तरीही वरुणराजाने अद्याप समाधानकारक हजेरी जिल्ह्यात लावलेली नाही. त्यामुळे यंदा खरीप हंगाम लांबणीवर पडणार आहे. पावसाच्या ओढीमुळे मूग, उडदासोबत भात लागवडीपुढे संकट ठाकले आहे. एवढेच नव्हे, तर ६३ गावे आणि २९ वाड्यांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी ऐन पावसाळ्यात ४५ टँकर धावताहेत. (insufficient rainfall for this year kharif season)

जिल्ह्यात आतापर्यंत ३१० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात बाजरी ३१ हेक्टर, मका २१७, मूग दोन आणि कपाशीच्या ६० हेक्टरचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात ६०, बागलाणमध्ये १८९, नांदगावमध्ये ६१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पावसावर या पेरण्या झाल्या आहेत. आता पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओल कमी झाली आहे. परिणामी, आठवडाभरात ही पिके वाया जाण्याचा धोका बळावला आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ६६ हजार ७८२ हेक्टर आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाताची रोपे टाकण्यास सुरवात केली आहे. प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकरी चांगल्या पावसाच्या हजेरीच्या प्रतीक्षेत आहेत. भातरोपांची पुनर्लागवड वेळेत न झाल्यास भाताच्या उत्पादनात घट होते. गेल्या वर्षी जिल्ह्यात दोन लाख १८ हजार ४३ हेक्टर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. २०१९ मध्ये चार हजार २३७ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

कृषी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात मका, सोयाबीन, बाजरी, तूर, कपाशीसाठी १५ जुलैपर्यंतचा वेळ शेतकऱ्यांकडे आहे, पण एक प्रश्‍न अनुत्तरित राहतो तो म्हणजे, या कालावधीत पेरण्यांना वेग येईल, असा पुरेसा पाऊस होईल काय? हवामान अभ्यासकांनी जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस धो धो होईल, असा अंदाज यापूर्वी वर्तविला आहे. त्याच वेळी पूर्वमॉन्सून पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्यात यापूर्वी पूर्वमॉन्सून पावसाने हजेरी लावली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा निम्मा पाऊस

पावसाळ्यातील जूनच्या पहिल्या पंधरवड्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात १४.९७ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत ७.६८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ७६.८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १४९.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याखेरीज जिल्ह्यातील सात मोठे आणि १७ मध्यम अशा २४ धरणांमध्ये २६ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ३० टक्के साठा होता. नाशिककरांच्या पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या गंगापूर धरणात ३९, कश्‍यपीत १७, गौतमी गोदावरीमध्ये १२ आणि आळंदीमध्ये ९ असा गंगापूर समूहात २८ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी तो ३ टक्क्यांनी अधिक होता. पालखेड धरण समूहात ११, ओझरखेड समूहात १९, दारणा समूहात २७, गिरणा समूहात ३२ टक्के साठा आहे.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

  • नाशिक- ५.१५ कळवण- ६.१०

  • इगतपुरी- ९.०३ बागलाण- १३.५२

  • दिंडोरी- ४.५६ सुरगाणा- ९.९३

  • पेठ- ६.६० देवळा- ७.७८

  • त्र्यंबकेश्‍वर- ३.९७ निफाड- ११.७२

  • मालेगाव- १७.९२ सिन्नर- १०.९१

  • नांदगाव- २.०४ येवला- १.९८

  • चांदवड- ९.६३ एकूण- ७.६८

राज्यातील विभागनिहाय टँकरसंख्या

  • कोकण : ५१

  • नाशिक : ७५

  • पुणे : ३४

  • मराठवाडा : ८१

  • अमरावती : ९५

  • नागपूर : १८

(सद्यःस्थितीत राज्यातील ४९३ गावे आणि ६८२ वाड्यांसाठी ३५४ टँकर सुरू आहेत.)

(insufficient rainfall for this year kharif season)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT