ITI Course esakal
नाशिक

ITI चे 3 विषयांचे एकत्रीकरण; ED, WCS आणि थेअरीची एकच 100 गुणांची परीक्षा

मधुकर घायदार

कनाशी (जि. नाशिक) : देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील तीन विषयांचे एकत्रीकरण करून यापुढे एकच पेपर घेतला जाणार आहे, असे मुंबईच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे (Directorate of Vocational Education and Training) संचालक दि. अं. दळवी यांनी कळविले आहे. (Integration of 3 subjects of ITI single 100 mark test for ED WCS and Theory Nashik News)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील फीटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर यांसारख्या इंजिनिअरिंग ट्रेडमधील प्रशिक्षणार्थी सध्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग (ईडी), वर्कशॉप कॅल्क्युलेशन ॲन्ड सायन्स (डब्ल्यूसीएस) आणि ट्रेड थेअरी असे तीन वेगवेगळे विषय शिकतो. या तिन्ही विषयांची परीक्षाही वेगवेगळी घेतली जाते. ज्यात ईडीचा पेपर ५० गुणांचा, डब्ल्यूसीएसचा पेपर ५० आणि ट्रेड थेअरीचा पेपर १०० गुणांचा घेतला जातो. या वर्षापासून तिन्ही विषयांची एकत्रित १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

यंदा २०२१-२२ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. मात्र, यापूर्वी ईडी, डब्ल्यूसीएस आणि थेअरी या विषयांतील अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी जुन्याच पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. देशभरातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना हा निर्णय लागू राहील, असे पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, सध्या ईडीचा पेपर ५० गुणांचा, डब्ल्यूसीएसचा पेपर ५० गुणांचा, ट्रेड थेअरीचा पेपर १०० गुणांचा आणि निदेशक अंतर्गत सत्र गुण ईडीसाठी २० गुण, डब्ल्यूसीएससाठी १० गुण, ट्रेड थेअरीसाठी २० गुण अशा एकूण २५० गुणांसाठी हे तीन विषय होते. हे तिन्ही विषय एकत्र करून १०० गुणांचे करण्यात आले आहेत. या सत्रासाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये ईडी व डब्ल्यूसीएससाठी स्वतंत्रपणे पेपर देण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची NSA अंतर्गत अटक योग्य आहे का ? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा

Pune Mumbai Expressway Traffic Jam : एसटी प्रवाशांनाही कोंडीचा फटका; पुणे विभागाच्या १७२ शिवनेरी बस रद्द

Kolhapur Hinjawadi ST bus resumed : कोल्हापूरहून पुणे-हिंजवडी मार्गावरील बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक पुन्हा सुरू

Kolhapur Corporators : ऐच्छिक निधीवरून महापालिकेत वादाची ठिणगी; महायुती-काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट! काही महिलांना ४५०० तर काहींना फक्त १५००… तुम्ही कुठल्या यादीत?

SCROLL FOR NEXT