(बातमी आवश्यक)
NSK26H31262
जळगाव : आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धेत सहभागी खेळाडूंसमवेत आयोजक व पंच.
‘नाहाटा’, व्ही. पी. होले महाविद्यालयाचे यश
आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभाग क्रीडा समितीतर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पुरुष गटात भुसावळच्या पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाने, तर महिला गटात केसीई व्ही. पी. होले शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पुरुषांचे चार आणि महिलांचे चार असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. जळगाव, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथील विविध महाविद्यालयांतील ४८ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर रमेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते झाले. यावेळी जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेश पाटील उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. नितीन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, पाल महाविद्यालयाचे डॉ. अमोल पाटील, आयएमआरच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. नीलिमा पाटील, केसीइ व्ही. पी. होले महाविद्यालयाचे प्रा. सय्यद इर्तिकाज आणि संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वीरेंद्र जाधव उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आले. पंचप्रमुख कृपालसिंग ठाकूर आणि प्रतीक हरिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या.
चौकट
पुरुष गटाचा निकाल
प्रथम पी. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ; द्वितीय केसीई व्ही. पी. होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जळगाव; तृतीय खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव.
महिला गटाचा निकाल
प्रथम केसीई व्ही. पी. होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जळगाव; द्वितीय – पी. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ; तृतीय आयएमआर, जळगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.