Marriage News esakal
नाशिक

Nashik News: महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह; धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार नाशिकमधील श्री गुरूगोविंद सिंह पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्रदिनी (ता. १) गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होईल. त्यामध्ये ५१ जोडप्यांचा मोफत विवाह होईल.

त्यासाठी २० एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. सोहळ्यासाठी निवडलेल्या जोडप्यांना माहिती कळवण्यात येईल. (Interfaith Community Marriage on Maharashtra Day Activities under direction of Charity Commissioner Nashik News)

सामुदायिक विवाहाची जबाबदारी समिती पार पाडणार आहे. धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. धर्मादाय उपायुक्त के. एस. जाधव, सहाय्यक आयुक्त राम लीप्ते, श्रीमती खरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्यरत आहे.

सोहळ्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील देवस्थान, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था आणि सेवाभावी संस्थांचे योगदान लाभत आहे. सोहळ्यात वधू-वराकडील ४० जणांच्या भोजनाची सोय करण्यात येणार असून वधू-वरांचे त्यांच्या धार्मिक पद्धतीने विवाह होतील. तसेच वधू-वरांसाठी पोशाख मंगळसूत्र व धार्मिक विधी साहित्य मोफत देण्यात येईल.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

विशेषतः सामान्य आर्थिक परिस्थिती असलेले आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, बेघर, ऊसतोड कामगार, भटक्या जाती-जमाती, अनुसूचित जाती, मागासवर्गीय, अनाथ पाल्यांचे विवाह होतील.

अलीकडच्या काळात विवाह सोहळे खर्चिक झाल्याने सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींना विवाह करणे अवघड होत चालले आहे. त्यातच मानापमान, रीती-रिवाज पार पाडावे लागतात. त्यावर उपाय म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्यांकडे कल वाढत चालला आहे. सोहळ्यात नाव नोंदणीसाठी नाशिकमधील जुना आग्रा महामार्गावरील श्री कालिका मंदिर या पत्त्यावर अथवा ९३९६२६९९१६ या मोबाईलवर नोंदणी करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT