पान-३ ॲंकर
YEO26B27424
क्वालालंपूर : येथील सन वे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन परिषदेत सहभागी संशोधक.
------------------
३६-५
मातोश्री अभियांत्रिकीतर्फे मलेशियात संशोधन परिषद
------------
आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यासपीठावर झेप, जगभरातील संशोधकांकडून ५६ संशोधन पेपर सादर
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटरने मलेशियातील क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे यशस्वी आयोजन केले. जगभरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५६ संशोधकांनी यात पेपर सादरीकरण केले.
-------------
क्वालालंपूर येथील सन वे विद्यापीठात एशियन रिसर्च फाउंडेशन आणि रिसर्च कल्चर सोसायटी यांच्या सहकार्याने मातोश्री अभियांत्रिकीने या परिषदेत विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आरोग्यशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध झाले. जगभरातील संशोधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत एकूण ५६ संशोधन पेपर्स सदर केले. परिषदेच्या आंतरराष्ट्रीय समितीमध्ये विविध देशांतील शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांचा समावेश होता. प्रमुख वक्त्यांमध्ये मलेशियातील मलाया विद्यापीठ येथील डॉ. अली सोरय्याई अझर, डॉ. राणिया लांपू तसेच मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक (प्राचार्य) डॉ. जी. के. खराटे, विभागप्रमुख डॉ. डी. डी. आहीरे उपस्थित होते.
संशोधन म्हणजे केवळ समस्येचा अभ्यास नव्हे, तर त्या समस्येकडे बघण्याची नवी दृष्टी विकसित करणे होय. याच विचारातून परिषदेत विविध संशोधन विषयांवर चर्चा, शोधनिबंध सादरीकरण, प्रकल्प व पोस्टर सादरीकरण, ई-पोस्टर सादरीकरण अशा शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करण्यात आला. संशोधनाच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. परिषदेमध्ये आयएसबीएन सहित परिषद कार्यवाही आणि नियतकालिकांमध्ये प्रकाशनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
--------------
आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग म्हणजे संस्थेच्या संशोधन संस्कृतीला अधिक व्यापक बनविणे होय. अशा उपक्रमांमुळे संशोधकांना नव्या संधी मिळत नवनवीन विचारांची देवाण-घेवाण व भविष्यातील संधी अधिक व्यापक होत असल्याचे डॉ. खराटे यांनी सांगितले. या परिषदेमधील सहभाग संस्थेच्या संशोधन, नवोपक्रम, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि जागतिक शैक्षणिक सहकार्याप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरला असे डॉ. आहीरे यांनी सांगितले. संस्थेचे सचिव कुणाल दराडे, संचालक डॉ. खराटे, उपसंचालिका डॉ. वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले. डॉ. प्रतिभा बनसुडे यांनी परिषद समन्वयक तसेच सूत्रसंचालन तसेच प्रा. मनीष मोहिते यांनी परिषदेची तांत्रिक समन्वयकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
----------------------
कोट
संशोधन परिषदेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरच्या संधी व शैक्षणिक वाटचालीची ओळख होईल. परिषदेच्या यशस्वी आयोजनातून मातोश्रीच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे.
- कुणाल दराडे, सरचिटणीस, मातोश्री शिक्षण संस्था
--------------
या परिषदेमुळे संस्थेच्या संशोधन संस्कृतीला अधिक व्यापक बनवले. संशोधकांना नव्या संधी मिळाल्या तसेच विविध क्षेत्रांतील विचारांची देवाणघेवाण झाली. यामाध्यमातून भविष्यातील शैक्षणिक सहकार्याचे मार्ग खुले होतील.
- डॉ. जी. के. खराटे, संचालक, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय, एकलहरे
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.