Arrest google
नाशिक

नाशिक : मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सहा सराईत जेरबंद

विनोद बेदरकर

नाशिक : उपनगर पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा पदार्फाश करीत मोबाईल चोरांकडून ५४ मोबाईल हस्तगत केले आहेत. यात तमिळनाडूतील सहा सराईतांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

मुरली मुरुगन (वय २४, थोत्तीथेराईतोत्तोर, वेल्लोर, तामीळनाडू), जगदीशन पल्लानी (वय ३०, टीटी मोटटोर पेरीया पल्लम, गुडीयाट्टम वेल्लोर), व्यंकटेश शंकर (वय ३३, ओटरपल्लीयम, गुडीयाटम, वेल्लोर), मंगेश पेरुमल (वय ३०, टीटी मोटोर, गुडीयाटम वेल्होर), मोहन रंगन (वय २२, ओटरपल्लीयम, गुडीयाटम, वेल्लोर), आरमुघम सुब्रमणी (वय ३३, नरीयम पट्टु, ओटर, सागरपुरम, नरीयमवट्टू, वेल्लोर) अशी संशयितांची नावे आहे.

शहर पोलिसांनी शनिवारी (ता.७) सायंकाळी साडे सातला संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील तपास करीत आहे. शहर पोलिसांनी संशयितांकडून शहर परिसरातील चोरलेले ५४ मोबाईल हस्तगत केले आहे.

वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक साळवे, काशीनाथ गोडसे, रामकृष्ण वाघ, अशोक वाजे, सुनील लोहरे, पुंजाराम गांगुर्डे, बाबू लखन, राहूल जगताप, अमोल टिळेकर, भूषण अनवट, सुदर्शन बोडके, गणेश भागवत, पंकज कर्पे, आनंदा घुगरे आदीच्या पथकाने केलेल्या या कारवाईत मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत होण्याची पोलिसांनी आशा आहे.

टाउनहॉलच्या लोखंडी प्लेटा जप्त

नाशिक रोड परिसरातील महापालिकेच्या महात्मा गांधी टाउन हॉल सभागृहाच्या लोखंडी प्लेटा चोरीप्रकरणी पोलिसांनी इगतपुरीतीला एकाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक केलेल्या संशयिताचे नाव अर्जुन खंडू म्हस्के (वय २८, इगतपुरी) आहे. त्याला काल शनिवारी (ता.७) साडे अकराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ११५ लोखंडी प्लेटा हस्तगत केल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक लोंढे, महिला पोलिस उपनिरीक्षक तेजल पवार, अशोक साळवे, रामकृष्ण वाघ, सुनील लोहरे, अशोक वाजे,पुंजाराम गांगुर्डे, बाबू लखन आदीच्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT