director vijay jadhav esakal
नाशिक

Nashik News : सामाजिक प्रश्नांचे भावविश्व उलगडणारा विजय; 12 शॉर्टफिल्म, 3 गाण्यांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मनोरंजन आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटांकडे बघितले जात असले तरी ‘शॉर्टफिल्म’च्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फुंकर मारणारा युवा दिग्दर्शक म्हणजे विजय रामप्रसाद जाधव. (interview of director vijay jadhav making short films related to social issues nashik news)

प्रेमाचा अर्थ सांगणारी ‘आस तुझ्या प्रेमाची’ असो की आई, वडिलांचे मुलीवरील आंधळे प्रेम व्यक्त करणारी ‘काळजाचा तुकडा’ व युवकांच्या आत्महत्येवर आधारित ‘आयुष्य एक संधी’ अशा विविधांगी लघुपटातून सामाजिक संदेश देत विजयने गेल्या सहा वर्षांत स्वत:ची पदरमोड करुन १२ शॉर्टफिल्म व तीन गाण्यांची निर्मिती केली आहे. सामाजिक विषयांची निवड करून तो प्रेक्षकांसमोर मांडण्याच्या त्याच्या कलेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न...

तुम्ही नाशिकमध्ये केव्हा आलात आणि कसे?

विजय : आम्ही मुळचे हिंगोली जिल्ह्यातील काळकोंडी येथील आहोत. १९९१ मध्ये वडील गवंडी कामानिमित्त कुटुंबासह नाशिकमध्ये आले. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वडील पुन्हा गावाकडे गेले. त्यामुळे माझे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावाकडे झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण नर्सी नामदेव येथील माध्यमिक शाळेत झाले. अकरावी ते एम. कॉम पर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कला क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?

विजय : २००१ मध्ये शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालो आणि कला क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हायला लागली. नृत्य शिक्षक संतोष खंदारे यांनी मला शिकवले. या कार्यक्रमात दर्जेदार सादरीकरण केल्याने प्रथम क्रमांकही मिळवला. त्यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो.

शिक्षणासोबत नोकरी आणि कला कशी जोपासता?

विजय : नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेत अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर शिक्षणासोबत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत कॉलेज. त्यानंतर रात्री नऊपर्यंत नोकरी करायचो आणि सुटीच्या दिवशी शॉर्टफिल्मसाठी चांगले ठिकाण शोधून ठेवायचो.

शॉर्टफिल्मच का आणि तीही सामाजिक विषयावरील का?

विजय : शॉर्टफिल्म ही अगदी १० ते १५ मिनिटांत तुम्हाला संदेश देवू शकते. त्यामुळे दर्जेदार पद्धतीने काम केल्यास लोक आपल्याला आठवणीत ठेवतात. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे असेल तर दीर्घकाळ स्मरणात राहतील अशाच विषयांची निवड करतो. त्यामुळे सामाजिक विषयांतून समाज परिवर्तन घडवण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.

कुठल्या विषयांवर लघुपट निर्माण केले?

विजय : आई, वडील आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. पण त्याचा गैरफायदा घेऊन मुले, मुली आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालवतात. यावर आधारित ‘काळजाचा तुकडा’, पोरखेळं, क्षण, कोरोनाकाळात ग्रामीण भागातील नातेसंबंधावर आधारित ‘ओलावा नात्यांचा’, एसटीचे महत्त्व सांगणारी ‘लालपरी’, युवकांच्या आत्महत्येवर आधारित ‘आयुष्य एक संधी’ अशा लघुपटांची निर्मिती केली. तर ‘होसू मी तुना नवरा’, ही नशा, तुझ्या लुकिंगचा आशिक अशा तीन मनोरंजनात्मक गाण्यांची निर्मिती केली आहे.

तुमचे स्वप्न काय?

विजय : सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार आहे. त्यासाठी आर्थिक पाठबळ हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे तोपर्यंत वाट बघणार आहे. पण लघूपटाच्या माध्यमातून मनोरंजनातून समाजप्रबोधनाचे काम सुरुच ठेवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT