IRCTC Food Menu 
नाशिक

IRCTC : रेल्वे प्रवासातील भोजनात पुरणपोळी!

‘आयआरसीटीसी’च्या‘मेन्यू’मध्ये बाजरीलाही प्रोत्साहन

अमोल खरे

मनमाड : रेल्वे प्रवासात महाराष्ट्रीय पुरणपोळी मिळणार आहे. तसेच, ‘मेन्यू’मध्ये बाजरीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. भारतीय रेल्वेच्या खानपान प्रशासनाशी संलग्न असलेल्या ‘आयआरसीटीसी’तर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश होता. रेल्वेने आपल्या पदार्थांमध्ये काही पदार्थांची भर टाकली. रेल्वे मंत्रालयाने त्यासंबंधीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना आपल्या आवडीनुसार पाककृतींचा आस्वाद घेता येईल.

पौष्टिक तृणधान्य बाजरीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ हे वर्ष ‘बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे ‘आयआरसीटीसी’तर्फे केंद्र सरकारच्या पौष्टिक खाद्यपदार्थांच्या उपक्रमाचा उत्सव साजरा होणार आहे. आता ‘मेन्यू’मध्ये बाजरी असेल.

प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खानपान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ‘आयआरसीटीसी’ला अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरवण्याची परवानगी दिली आहे .रेल्वेच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्क समाविष्ट असते.

अशावेळी अगोदर सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ ‘आयआरसीटीसी’ निश्‍चित करणार आहे. प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असलेले अथवा प्राधान्य दिले जाणारे खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीतील खाद्यपदार्थ, मुलांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरड धान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ आदींचा समावेश प्रवाशांच्या जेवणात व्हावा, या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय इतर मेल अथवा एक्स्प्रेस गाड्यांमध्येही अगोदर सचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थांची निवड ‘आयआरसीटीसी’द्वारे करण्यात येणार आहे. जनता गाड्यांमधील जेवणाची यादी आणि शुल्क यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आहार करतो आरोग्याचे रक्षण

आहार : प्रीणनः सद्यो बलकृद्देहधारकः।

आयुस्तेज : समुत्साहस्मृत्योजोऽग्निविवर्द्धनः।

आयुर्वेदाची आहारविषयक शिकवण. अर्थात, निरोगी व्यक्तींच्या आरोग्याचे रक्षण आणि आजार रोखण्यासाठी आहार औषधांपेक्षा कमी नाही. आहाराने संतुष्ट होत असताना शक्ती मिळते. वय, तीक्ष्णता, उत्साह, स्मरणशक्ती, ऊर्जा व पचनशक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील ऊसदर आंदोलनात भाजपचा सहभाग

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT