Garbage in city esakal
नाशिक

Nashik : आडगावात अनियमित घंटागाड्या; जागोजागी कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या व महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाड्या नियमित येत नाहीत. त्यामुळे घरातील कचरा इतरत्र टाकून देण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय मळे वस्तीतील पथदीपही अनेक दिवसांपासून बंदच आहेत. (Irregular garbage trucks in adgaon Piles of garbage everywhere Nashik Latest Marathi News)

नाशिक महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी सर्वात मोठे गाव म्हणून आडगावची ओळख आहे. अनेक गावकरी मळ्यात वस्तीला गेले तरी अद्यापही गावात मोठ्या प्रमाणावर गावकरी राहतात. याशिवाय शहरी भागातील घरभाडे परवडत नसल्याने अनेकांनी गावात भाड्याची घरे घेतली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे गावकरी सांगतात.

गत महिन्यापासून गावात घंटागाड्या नियमित येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घंटागाडी येत नसल्याने किंवा अवेळी येत असल्याने अनेकजण गावालगत मोकळ्या जागेत कचरा टाकून देत आहेत. यामुळे डासांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. एकीकडे शहरात डेंगी, मलेरिया, साथजन्य रोगांची साथ सुरू असतानाच कचऱ्याचे ढीग ग्रामस्थांची चिंता वाढविणारे आहेत. संपूर्ण गावात डास निर्मुलन मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.

सर्पदंशांचा धोका

महापालिकेतर्फे गाव व परिसरात पथदीप बसविण्यात आले आहेत, मात्र पावसाळी वातावरणात त्यातील अनेक पथदीप बंदच आहेत. एखाद्या भागातील पथदीप बंद झाल्यावर महिनोमहिने त्याकडे लक्षच दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यामुळे सर्प बिळांतून बाहेर येत असल्याने सर्पदंशांचाही धोका वाढला आहे.

"गत महिन्यापासून अनियमित घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबंधित विभागांना कळवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रभागातील नागरिकांसह मनपावर कचराफेक आंदोलन करण्यात येईल."

- शीतल माळोदे, माजी नगरसेविका, आडगाव

"गत महिन्यापासून आडगावात नियमित घंटागाडी येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय बऱ्याच भागातील पथदीपही बंदच आहेत."

- विद्या शिंदे, आडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT