Water Resources Department of Maharashtra esakal
नाशिक

Nashik News : सिंचन पुनर्स्थापना खर्चाची दंडमाफी शासन दरबारी; निर्णयाची प्रतीक्षा

विक्रांत मते

नाशिक : सिंचन पुनर्स्थापना खर्चाच्या मुद्यावरून जवळपास अकरा वर्षांपासून रखडलेला महापालिका व जलसंपदा विभागातील २०४१ पर्यंतच्या पाणी वापराच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे.

परंतु यापूर्वी, आकारण्यात आलेली दुप्पट आकारलेली पाणीपट्टी न भरल्याने अशी एकूण जवळपास १९५ कोटी रुपयांची माफी करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाला पुढील आठवड्यात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. (Irrigation restoration costs waived by government court Awaiting decision Nashik News)


गंगापूर धरण समूहात गंगापूरसह गौतमी, कश्‍यपी व मुकणे या धरणांचा समावेश होतो. त्या शिवाय दारणा व मुकणे धरणातून देखील शहराला पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर व दारणा धरणातून पिण्यासाठी प्राप्त होणारे पाणी जलसंपदा विभागामार्फत आरक्षित केले जाते. पाणी आरक्षित करताना महापालिका व जलसंपदा विभागात करार होतो. तसा करार २०११ पर्यंत होता.

परंतु, सिंचन पुनर्स्थापना खर्चाचा वाद निर्माण झाल्याने करारनामा रखडला. पिण्याच्या पाण्याचा वापर वाढल्याने जलसंपदा विभागाने सिंचन पुनर्स्थापना खर्चाची अट टाकली. त्याअनुषंगाने जलसंपदा विभागाने २०११ मध्ये महापालिकेला सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी १५३ कोटी रुपये अदा करण्याची सूचना केली.

परंतु, महापालिकेने सिंचन पुनर्स्थापना खर्चाला हरकत घेतली. त्यानंतर लाभक्षेत्र प्राधिकरणाकडे झालेल्या बैठकीत २०१३ चा पाणी वापर गृहीत धरून सिंचन पुनर्स्थापना खर्चाची रक्कम ८५ कोटी रुपयांवर आणली गेली. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या प्रधानसचिवांकडे झालेल्या बैठकीनुसार पुन्हा १९९५ ते २०१४ या कालावधीचा विचार करून सिंचन पुनर्स्थापना खर्च कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

त्यानुसार ५३ कोटी ४८ लाख रुपये रक्कम निश्‍चित करण्यात आली. मात्र, त्यानंतरही जलसंपदा विभागाने २००६ ते २०१८ या कालावधीसाठी १३५.६८ कोटी रुपये सिंचन पुनर्स्थापना खर्च असल्याचे महापालिकेला कळविले. महापालिकेकडून धरणातून जितके पाणी उचलले जाते, त्यातील वापर झालेले पाणी वगळता ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून पुन्हा गोदावरी नदीत सोडले जात असल्याने सिंचन पुनर्स्थापना खर्च लागूच होत नसल्याची भूमिका घेतली.

या वादात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्ती करत मार्ग काढून प्रथम पाणी वापर कराराच्या सूचना दिल्या. करारनाम्याचा मसुदा महासभेने मंजूर केला. त्यानंतरही विलंबाने मागील वर्षात महापालिका व जलसंपदा विभागात करार झाला.

जलसंपदा विभाग घेणार अंतिम निर्णय

करारामुळे दुप्पट दराने पाणीपट्टी आकारणी होत नाही. परंतु, सिंचन पुनर्स्थापना खर्चाचे १३५.६८ कोटी रुपये व दुप्पट पाणीपट्टीची दंडात्मक साठ कोटी रुपयांची अशी एकूण जवळपास १९५ कोटी रुपयांचा बोजा कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महापालिका व जलसंपदा विभागाचा युक्तिवाद ऐकून त्यावर अंतिम निर्णय होईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT