Dada Bhuse & Advay hire 
नाशिक

Nashik Political: हिरे-भुसे वादाचा दुसरा अंक सुरू! हिरे यांच्या संस्थेतील कर्मचारी, सभासद कर्ज चौकशीचे सहकारकडून आदेश

राज्याचे सार्वजिनक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरे कुटुंबियांच्या संस्थेतील बोगस भरती प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा बॅंकेतील कर्ज प्रकरणाच्या वादात हिरे अडकले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे सार्वजिनक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरे कुटुंबियांच्या संस्थेतील बोगस भरती प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा बॅंकेतील कर्ज प्रकरणाच्या वादात हिरे अडकले आहेत.

हा वाद शमत नाही तोच भुसे व हिरे यांच्यातील वादाच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. (issue of hiray bhuse debate begins Hire organization employees member loan inquiry order from cooperative Nashik Political)

मालेगाव येथील व्यंकटेश सहकारी बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक व कर्मवीर भाऊसाहेब हिरे वेतनदार सह. पतसंस्था यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थांतील कर्मचाऱ्यांना तसेच इतर सभासदांना दिलेल्या कर्जाच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.

याबाबत, पालकमंत्री भुसे यांनी सहकार विभागाकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थांतील कर्मचाऱ्यांना व्यंकटेश सहकारी बँक लि., मालेगांव या बँकेने केलेल्या कर्जवाटपाची नियमित दरमहा वसुली संबंधीतांच्या वेतनातून होत नाही.

उक्त कर्जदारांपैकी काही कर्जदारांवर इतर पतसंस्थांची कर्जे / गृहकर्ज आहेत. तथापि संबंधीत बँकेने याची खातरजमा न करता बेकायदा कर्जवाटप केले आहे.

त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला आहे. तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या नावाने व्यंकटेश सहकारी बँक लि., मालेगांव, नाशिक जिल्हा महिला विका सहकारी बँक व कर्मवीर भाऊसाहेब हिरे वेतनदार सह. पतसंस्थेतून कर्ज काढले जाते.

कर्ज रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावरून रोख स्वरुपात काढून ती संस्थाचालकांना खासगी कामासाठी दिली जाते. यामुळे कर्ज रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होत नसल्याचा आरोप केला आहे.

हिरे यांचे पाय आणखी खोलात

महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थांच्या खात्यावर विद्यार्थी स्कॉलरशिप, शैक्षणिक फी, अनुदान, कर्ज, शासकीय योजनांचा निधी व इतर बाबींतून जमा निधीतून या संस्थांच्या खात्यातील रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करून कर्मचाऱ्यांचे कर्ज फेडले जाते.

सन २०१० पूर्वीपासून या पध्दतीने कामकाज केले जाते, अशी तक्रार भुसे यांनी केली होती. याची दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे अपर निंबधक शैलेश कोतमिरे यांनी नाशिक सहकारी संस्थेतील विशेष लेखापरिक्षक (फिरते पथक) संतोष वाघचौरे यांना दिले आहेत. यामुळे हिरे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT