NSK26H33932
जळगाव : आरोग्य विभागाच्या बैठकीत बोलताना सीईओ करिश्मा नायर. शेजारी महिला बालविकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते आदी.
–––
आरोग्य योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
(उपशीर्षक)
सीईओ करिश्मा नायर : आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३०: जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत. आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज (ता. २९) आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत आरोग्य योजनांची तालुकानिहाय प्रगती, उद्दिष्टपूर्ती आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी माहिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक वाणी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विवेक सावटे, डॉ. दीपक जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य सेवा, उपस्थितीबाबत कडक निर्देश देण्यात आले. तसेच माता, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आले.
चौकट
आरोग्य कार्यक्रमांचा आढावा
बैठकीत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, एचपीव्ही लसीकरण, १०० दिवस अभियान, ‘तिशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला’, ‘माझं गाव– आरोग्य संपन्न गाव’ अभियान, आयुष्मान कार्ड आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यासह विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.