Sarang Ahire esakal
नाशिक

Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

मनोहर शेवाळे

जायखेडा (जि. नाशिक) : जायखेडा ता. बागलाण येथील रहिवाशी असलेले व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सारंग अशोक अहिरे (वय- ३२) यांचा आसाम येथे दुर्दैवी मृत्यू झाला. पण मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच संपुर्ण गाव व परिसर शोककळा पसरली. सारंगच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजाई, असा परिवार आहे. (Jaikheda indian army soldier dies in Assam Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सारंग यांनी अतिशय हालकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंतचे शिक्षण जायखेडा जनता इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण ताहाराबाद येथे पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. सारंग हे भारतीय सैन्य दलात १०३ इंजिनिअरकडे गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत होते. रविवार (दि. २५) रोजी रात्री कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे ते कर्तव्यावर असतांना मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना त्यांच्या विभागाकडून कळविण्यात आले. सारंगच्या मृत्यूची बातमी सकाळी बागलाण तालुक्यात वनव्यासारखी पसरताच सर्वत्र शोककळा पसरली.

सारंग अहिरे याचे पार्थिव आज मंगळवार (दि. २७) रोजी दुपार पर्यंत जायखेडा येथे पोहचण्याचा अंदाज असून, त्यांना शासकीय इतमामात गावावरच अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT