शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर
उपशीर्षक
आमदार भोळेंच्या पाठपुराव्याला यश; प्रमुख प्रवेशमार्ग प्रकाशाने उजळणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महापालिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (ता.५) निर्गमित करण्यात आला आहे.
जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक वातावरण उपलब्ध होईल. या निधीबद्दल आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
-----
NSK26H34625
कोट
‘शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
- सुरेश (राजूमामा) भोळे
आमदार, जळगाव शहर
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.