नाशिक

समित्यांची स्थापना रखडली; महापालिकेच्या कारभाराला ‘समिती’चा अडथळा

CD
टुडे मेन फिचर : --- (महापालिकेची इमारत वापरावी) --- महापालिका प्रभाग समित्यांच्या स्थापनेला ‘ब्रेक’ नऊ महिन्यांनंतर प्रस्ताव महासभेत; आरोग्य, जैवविविधता, परिवहन समित्याही रखडल्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : महापालिका निवडणुकीला नऊ महिने उलटूनही नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रभाग समित्यांची स्थापना अद्याप झालेली नाही. प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ गठीत करण्याचा प्रस्ताव अखेर आगामी महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सीमांकनाच्या वादामुळे १५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी प्रस्तावात कोणतीही दुरुस्ती अथवा बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत झालेल्या नवीन वॉर्डरचनेमुळे शहरातील अनेक भागांचे प्रभाग बदलले आहेत. पूर्वीच्या प्रभाग समित्यांमध्ये समाविष्ट असलेले काही भाग आता दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी प्रभाग समित्यांची रचना करताना नव्या वॉर्डरचनेऐवजी पूर्वीपासून संबंधित समितीमध्ये असलेले भौगोलिक क्षेत्र कायम ठेवण्याची भूमिका मांडली होती. यावरून सीमांकनाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एप्रिलमधील महासभेत प्रभाग समित्यांचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस दुरुस्ती पुढे आलेली नाही. दरम्यान, केवळ प्रभाग समित्याच नव्हे, तर महापालिकेतील अन्य महत्त्वाच्या समित्यांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. आरोग्य समितीची अद्याप स्थापना झालेली नसून, त्याबाबतही कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. शहरातील स्वच्छता, आरोग्यसेवा, साथीचे आजार, नागरी आरोग्य केंद्रे यांसारख्या विषयांवर या समितीची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींचे प्रभावी नियंत्रण राहण्यासाठी समितीची नियुक्ती आवश्यक आहे. जैवविविधता समितीचीही प्रतीक्षा महापालिकेच्या माध्यमातून जैवविविधता समिती स्थापन करण्यासाठी प्रतिनिधींची नावे मागविण्यात आली होती. मात्र, या समितीसाठी मोजक्याच प्रतिनिधींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आवश्यक संख्येने नावे उपलब्ध झाल्यानंतरच समिती गठीत होण्याची शक्यता आहे. शहरातील वृक्षसंपदा, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरणाशी संबंधित विषयांमध्ये या समितीला महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे. चौकट इ-बससाठी परिवहन समितीची गरज जळगाव शहरासाठी महापालिकेच्या माध्यमातून इ-बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र परिवहन समिती असणेही आवश्यक ठरणार आहे. बससेवेचे नियोजन, मार्ग, थांबे, प्रवासी सुविधा आणि संबंधित कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी समितीची भूमिका महत्त्वाची राहू शकते. त्यामुळे आगामी काळात परिवहन समितीच्या नियुक्तीचा विषयही महापालिकेसमोर येण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर नव्या लोकप्रतिनिधींची रचना अस्तित्वात आली असली, तरी विविध समित्यांच्या स्थापनेअभावी निर्णयप्रक्रियेला अपेक्षित संस्थात्मक स्वरूप मिळालेले नाही. त्यामुळे आगामी महासभेत प्रभाग समित्यांसह प्रलंबित समित्यांच्या नियुक्त्यांबाबतही ठोस निर्णय घेण्याची मागणी नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT